कोकण रेल्वेचे डब्यांचे दरवाजे उघडे ठेवण्यावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वेचे डब्यांचे दरवाजे उघडे ठेवण्यावर भर
कोकण रेल्वेचे डब्यांचे दरवाजे उघडे ठेवण्यावर भर

कोकण रेल्वेचे डब्यांचे दरवाजे उघडे ठेवण्यावर भर

sakal_logo
By

rat7p4.jpg
48561
रत्नागिरीः येथील स्थानकावर प्रवेशद्वारावर घातलेले बॅरिकेटस्.
- rat7p3.jpg ः
48560
तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी उडालेली झुंबड.
- rat7p2.jpg ः
48559
पहाटेच्या दादर पॅसेंजरसाठी रात्रीच ठाण मांडून असलेले चाकरमानी.
(छाया ः राजेश कळंबटे, रत्नागिरी)
------------------------

डब्यांचे दरवाजे उघडे ठेवण्याची तजवीज
कोकण रेल्वेमार्गावर माणगावातील प्रकारानंतर काळजी; स्थानकांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त
रत्नागिरी, ता. ७ ः कोकण रेल्वेमार्गावर माणगाव येथे मंगळवारी (ता. ६) गणपती विशेष रेल्वेगाडीचे डबे न उघडल्यामुळे संतप्त प्रवाशांनी दगडफेक केली. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सायंकाळनंतर सर्वच रेल्वेस्थानकांवरील बंदोबस्त वाढवण्यात आला. सर्व डब्यांचे दरवाजे उघडे राहतील याची विशेष काळजी रेल्वे पोलिस घेत होते. त्यामुळे सायंकाळनंतरचा प्रवास सुरळीत झाला; परंतु यंदा अपेक्षेपेक्षा अधिक चाकरमानी कोकणात दाखल झाल्याने परतीच्या प्रवासावेळी कोकण रेल्वे पूर्णतः भरून मुंबईकडे रवाना होत होत्या.
मडगाव, सिंधुदुर्गकडून येणाऱ्या सर्वच गाड्या भरलेल्या असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय होती. खेड स्थानकावर मंगळवारी रात्री डब्यांचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवाशांमध्ये तु तु मै मै झाली होती. वेळीच रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्यावर पडदा पडला. गाड्यांमध्ये बसण्यासाठीच नव्हे तर उभे राहायलाही जागा नव्हती. रत्नागिरी स्थानकातही सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांबरोबर स्थानिक पोलिसांचे पथक नियुक्त केले होते. यामध्ये एक उपनिरीक्षक आणि दोन कॉस्टेबलचा समावेश होता. तसेच प्रवाशांनी भरगच्च झालेल्या गाड्यांमध्ये तीन रेल्वेचे गार्ड नियुक्त केले होते. गाडी स्थानकावर आल्यानंतर सर्व डब्यांचे दरवाजे उघडे राहतील, याची काळजी घेतली जात होती. मंगळवारी सायंकाळी आठ वाजल्यानंतर दोन गणपती विशेष गाड्या मुंबईकडे रवाना झाल्यामुळे तुतारी, कोकणकन्या या दोन गाड्यांवरील भार कमी झाला होता. संगमेश्‍वर, चिपळूण, खेड स्थानकावरही याच पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. आरक्षित डब्यांमध्ये अनेक प्रवासी बसून राहिल्यामुळे तिकीट आरक्षित असलेल्या प्रवाशांना चढता येत नाही. त्यामधूनच माणगाव, खेड स्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता. हे लक्षात घेऊन पोलिसांनी पावले उचलली होती. त्यामुळे मंगळवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, रत्नागिरी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (ता. ६) सायंकाळी एक चारचाकी मागे येत असताना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर गेली असती. त्यावरून गाडीचालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वादावादी झाली. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी बाहेरील बाजूस बॅरिकेटस् लावून गाड्या आतमध्ये येणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घेतली होती.

कोट
रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली होती. अनंत चतुर्दशीपर्यंत याच पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
- अजित मधाळे, निरीक्षक, रेल्वे पोलिस
--
चौकट
रोहा-चिपळूण-रोहा मेमू रद्द
रोहा-चिपळूण-रोहा मेमू स्पेशल ही गाडी रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रोहा येथील जनआंदोलनामुळे ही गाडी रद्द केली गेली. या गाडीच्या फेऱ्या १२ सप्टेंबरपर्यंत सोडण्यात येणार होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94176 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..