फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

48679
डेगवे ः येथे विसर्जनापूर्वी गणरायाची आरती करताना भाविक. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात ६१० घरगुती बाप्पांना निरोप
बांदा, ता. ७ ः ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात व फटाक्यांच्या आतषबाजीत बांद्यात सात दिवसांच्या एकूण ६१० घरगुती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. पावसाने घेतलेली विश्रांती आणि लहानांपासून थोरांपर्यंत असलेली भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने गणरायांचे विसर्जन करण्यात आले. बांदा शहरात ठिकठिकाणी तेरेखोल नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागात पाणवठ्याकडे सर्व गणपती एकत्रित येत मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
.................
४८५५६
कैवल्य मेस्त्री, कृष्णा पांचाळ

चिमुकल्यांच्या कलेचे दर्शन
तळेरे : मूळ वारगाव (ता. कणकवली) येथील मुंबईस्थित कैवल्य मेस्त्री आणि कृष्णा पांचाळ या चिमुकल्यांनी गणेशोत्सव काळात विविध रुपातील बाप्पांची १० चित्रे रेखाटली आहेत. चित्रकलेची आवड असणाऱ्या या चिमुरड्या कलावंत भावंडांनी बाप्पाप्रती असलेली भक्ती कलेमधून व्यक्त केली. गणेशोत्सवासाठी ते वारगाव येथे आले आहेत. या काळात त्यांनी आपली चित्रकलेची आवड जोपासताना गणपती बाप्पाची रेखाटलेली विविध चित्रे लक्षवेधी ठरली आहेत. कैवल्य आठवीत, तर कृष्णा ही मालाड़ येथील महाराणी सईबाई विद्यामंदिरात पहिलीत शिकत आहे. तिने शून्य, चार टिंब, ओम तसेच ८, ९ आणि ५ या अंकांपासून बाप्पाची विविध सुंदर रुपे साकारली आहेत. त्यासाठी तिला वडील सूर्यकांत पांचाळ यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94216 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..