मुरादपूर तंटामुक्ती अध्यक्षपदी बांडागळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरादपूर तंटामुक्ती अध्यक्षपदी बांडागळे
मुरादपूर तंटामुक्ती अध्यक्षपदी बांडागळे

मुरादपूर तंटामुक्ती अध्यक्षपदी बांडागळे

sakal_logo
By

मुरादपूर तंटामुक्ती अध्यक्षपदी बांडागळे
साडवलीः देवरूख नजीकच्या मुरादपूर गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी रवींद्र बांडागळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ग्रामसभा काही दिवसांपूर्वी पार पडली. यामध्ये बांडागळे यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. बांडागळे हे माजी ग्रा. पं. सदस्य असून गेली १५ वर्षे ते ग्रामपंचायतीच्या ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्षपदाची धुरा अतिशय चांगल्याप्रकारे सांभाळत आहेत. त्यांची गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिक्षकनेते बांडागळे गुरूजी, सरपंच मंगेश बांडागळे, उपसरपंच पर्शराम चोगले, ग्रा. पं. सदस्य प्रकाश चाचे, स्वरा बांडागळे, दिक्षा बांडागळे, किर्ती चोगले, खैरून गडकरी, ग्रामसेवक शैलेश कुरधुंडकर, अंगणवाडी सेविका शर्मिला चाचे, नितीन बांडागळे, अनिल बांडागळे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.
-------------
सामूहिक प्रवेशपरीक्षेत कृषी महाविद्यालयाचे यश
चिपळूण ः शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सामूहिक प्रवेशपरीक्षेमध्ये देदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. यामध्ये अलजो जेम्स-वनस्पती रोगशास्त्र विभाग अपर्णा के, भाजीपाला विज्ञान विभाग समृद्धी विभुते, वनस्पती रोगशास्त्र विभाग ऐश्वर्या विचारे व स्नेहा जोग, काढणीपश्चात तंत्रज्ञान विभाग सिद्धी नाईक, जेनेटिक्स व वनस्पती प्रजनन विभाग संजय वाघमोडे, कृषी विस्तार विभाग ऋषिकेश कोंडुसकर व सौरभ जाधव, कृषी व्यवसाय व्यवस्थापन विभाग आदींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94227 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..