फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

48750
नाजुका खान

वेशभूषा स्पर्धेत नाजुका प्रथम
बांदा ः मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत पहिली ते दुसरी गटात बांदा केंद्रशाळेची दुसरीची विद्यार्थिनी नाजुका खान हिने राज्यातून प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. यामध्ये तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा साकारली होती. तिच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, सरपंच अक्रम खान, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी अभिनंदन केले.
--
खासगी वाहतुकीलाही पसंती
कणकवली ः गौरी-गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ज्या प्रवाशांना रेल्वे अथवा एसटीचे आरक्षण उपलब्ध झालेले नाही, अशा प्रवाशांनी मोर्चा खासगी बसेसकडे वळवला आहे. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाठी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी खासगी बसेस दाखल झाल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर यंदा जादा गाड्या सोडण्यात आल्या तरीही प्रवाशांना आरक्षण उपलब्ध होत नाही. अनेक प्रवासी अजूनही प्रतीक्षा यादीवर आहेत. या प्रवाशांनी आपला मोर्चा खासगी बसेसकडे वळवला आहे. राज्य परिवहन मंडळाने चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या असल्या तरीही बहुतांशी प्रवासी हे खासगी बसेसमधून मुंबई व पुण्याकडे जाताना दिसत आहेत.
-----
वेंगुर्लेत सोमवारी ‘मुक्त संवाद’
मालवण ः बॅ. नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्लेतील नगर वाचनालय व बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित आस्थेचे प्रश्न-वर्तमान सामाजिक आणि राजकीय, सामाजिक आणि साहित्य-संस्कृतीविषयी साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी मुक्त संवाद कार्यक्रम सोमवारी (ता.१२) सायंकाळी साडेचारला वेंगुर्ले नगर वाचनालयात आयोजित केला आहे. संवादक डॉ. महेश केळुसकर, संध्या नरे-पवार, सुमती लांडे, अ‍ॅड. देवदत्त परुळेकर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन वेंगुर्ले नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94250 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..