राजापूरात पाणीटंचाई निवारण्यासाठी आत्तापासूनच तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूरात पाणीटंचाई निवारण्यासाठी आत्तापासूनच तयारी
राजापूरात पाणीटंचाई निवारण्यासाठी आत्तापासूनच तयारी

राजापूरात पाणीटंचाई निवारण्यासाठी आत्तापासूनच तयारी

sakal_logo
By

rat7p29.jpg-
L48756
राजापूरः कोदवली धरणाच्या येथे बंधारा बांधण्यासाठी त्या परिसराची पाहणी करताना मुख्याधिकारी प्रशांत भोसले व मुख्य लिपीक जितेंद्र जाधव
--------------------
पाणीटंचाई निवारण्यासाठी आत्तापासूनच तयारी
राजापूर पालिका ; सायबाच्या धरणाजवळ बांधणार बंधारा
राजापूर, ता. ७ ः यावर्षी कमी पडलेल्या पावसामुळे शहराला उन्हाळ्यात भासणारी संभाव्य भीषण पाणीटंचाई लक्षात घेवून नगर पालिकेने मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आतापासून जोरदार तयारी केली जात आहे. त्यामध्ये कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या वरच्याबाजूला बंधारा बांधून त्यामध्ये आतापासून पाणीसाठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी आज प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालिकेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव उपस्थित होते.
शहराला नैसर्गिकरीत्या पाणीपुरवठा करणार्‍या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूस सध्या नवीन धरणाचे काम सुरू आहे. अपूर्णावस्थेमध्ये असलेले धरणाचे हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी आणखीन काही निधीची आवश्यकता आहे. अशा स्थितीमध्ये नव्या धरणातून शहराला पाणीपुरवटा होण्यामध्ये विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी कमी पाऊस आणि दरवर्षी वाढत जाणारे तापमान यामुळे धरणातील पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे लक्षात घेवून पालिका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्याच्या अनुषंगाने नियोजन सुरू केले आहे.
कोदवली आणि शिळ जॅकवेल परिसरात दरवर्षी नगर पालिकेतर्फे वनराई बंधारे बांधून पाणी अडविले जाते. मात्र यावर्षी कोदवली धरणात तसेच जुन्या आणि नवीन धरणाच्यामध्ये असलेल्या भागात पाणीसाठा कायमस्वरूपी टिकून रहावा यासाठी जुन्या धरणाच्या वरच्या बाजूला एका मोठा बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी सांगितले. त्यासाठी श्री. भोसले व मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांनी प्रत्यक्ष धरण परिसराची पाहणी केली. या बंधारा बांधण्यासाठी यासाठी तत्काळ निविदा काढून ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून सद्यस्थितीमध्ये वाहणार्‍या पाण्याचा साठा या बंधार्‍यात होवून राहील. हा पाणीसाठा भविष्यामध्ये आवश्यकतेनुसार खाली धरणाकडे घेऊन ते तालीमखाना साठवण टाकीत आणणे सोपे होईल.
---------
चौकट
गाळ उपशाची गरज
धरणामध्ये पाणीसाठा होण्यासाठी वर्षानुवर्षे साठलेला गाळाचा उपसाही करणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी अद्यापही निधीची मंजूरी मिळालेली नाही. गाळ उपशाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी सुमारे सहा कोटीची गरज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94256 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..