स्टार्टअप यात्रेचे कणकवलीत स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार्टअप यात्रेचे कणकवलीत स्वागत
स्टार्टअप यात्रेचे कणकवलीत स्वागत

स्टार्टअप यात्रेचे कणकवलीत स्वागत

sakal_logo
By

48758
कणकवली : राज्‍य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक, नाविन्यता विभागाच्या स्टार्टअप यात्रेचे येथील कणकवली कॉलेजमध्ये स्वागत करताना मान्यवर.

स्टार्टअप यात्रेचे कणकवलीत स्वागत
कणकवली, ता.७ : कणकवली कॉलेज आणि राज्‍य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक, नाविन्यता विभागाच्या संयुक्त विद्यमाने काढलेल्या स्टार्टअप यात्रेचे स्वागत आज कणकवली कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले. या यात्रेमध्ये रोजगार संधीच्या अनुषंगाने प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर होणार आहे.
यावेळी पर्यवेक्षक प्रा.मंगलदास कांबळे, प्रा.हरिभाऊ भिसे प्रा. युवराज महालिंगे, प्रा.राजेन्द्र मुंबरकर प्रा.सोमनाथ कदम. प्रा. राजू जामदार तसेच एनएसएस, एनसीसी, ग्रामीण विकास, सांस्कृतिक विभाग, सिनियर व ज्युनिअर, व्यावसायिक अभ्यासक्रमचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
स्टार्टअप उपक्रमांतर्गत युवकांना प्रशिक्षण शिबीर व उद्योग, व्यवसायाच्या अनुषंगाने नाविण्यपूर्ण उपक्रम सादरीकरण स्पर्धा होणार आहे. तसेच प्रशिक्षण शिबिरही होणार असून या शिबिरात भाग घेण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना कणकवली कॉलेजमध्ये नोंदणी करता येणार आहे. स्टार्टअप अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम तसेच सर्वोत्तम संकल्‍पना सादरीकरणाला २५ हजाराचे पारितोषिक दिले जाणार आहे. पहिल्‍या टप्प्यात राज्‍यभरातून १० संकल्‍पना निवडल्‍या जाणार आहेत. यातील विजेत्या स्पर्धकाला प्रत्येकी रुपये एक लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले जाणार आहे, अशी माहिती स्टार्टअपचे जिल्हा समन्वयक शिवानी गरड, गणेश मुंढे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94261 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..