शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका नाही
शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका नाही

शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका नाही

sakal_logo
By

48746
विनायक राऊत

शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका नाही

खासदार विनायक राऊत ः सत्ता संघर्षाचा निर्णय लवकरच होईल

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करावी, अशी देशवासीयांची इच्छा आहे. जो घटनात्मक पेच निर्माण झाला आहे, तो सर्वोच्च न्यायालयातूनच सुटू शकतो. त्याला दिशा मिळू शकते. लोकशाहीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आहे. त्या दृष्टीने शिवसेनेतर्फे जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. ते सर्वोच्च न्यायालयात मजबूत व खंबीरपणे बाजू मांडत आहेत. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. आज पूर्णपणे राष्ट्रीय कार्यकारिणीचे ९५ टक्के सदस्य हे शिवसेनेसह, उद्धव ठाकरेंसोबत आहेत. ४० आमदार आणि काही किरकोळ कार्यकारिणीचे सदस्य सोडले तर शिवसेनेच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज स्पष्ट केले.
गणेशोत्सवानिमित्त तळगाव या आपल्या गावी आलेल्या खासदार राऊत यांची पत्रकारांनी भेट घेतली. ते म्हणाले, ‘‘शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. शिवाय ती निवडणूक आयोगाकडेही मांडली आहे. दुर्दैवाने त्यावरील निर्णय अद्याप झाला नसून तो लवकरच होईल, अशी आशा आहे. अमित शहा मुंबईत येऊन जे काही बोलले, त्यावरून त्यांच्या पोटात जे होते, ते ओठातून बाहेर आले. त्यावेळच्या मोरारजी देसाईंना मुंबई केंद्रशासित करायची होती, ती महाराष्ट्राच्या जनतेने होऊ दिली नाही. यात अनेकांनी बलिदान दिले आणि मुंबई मिळविली. दुर्दैवाने आजही त्याचपद्धतीने मोरारजी देसाईंचा कपटी डाव शिवसेनेतील गद्दारांच्या माध्यमातून पुन्हा पूर्णत्वास आणण्याचे षड्‍यंत्र दिल्लीकरांनी राबविले आहे. म्हणूनच शिवसेनेची निशाणी गोठवायची, शिवसेनेच्या नावावर हक्क सांगायचा, कागदपत्रांवर हक्क सांगायचा, एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही हक्क सांगायचा, अशी प्रवृत्ती गद्दार लोकांच्या माध्यमातून राज्यात राज्यकर्ते साकारू पाहत आहेत."
ते म्हणाले, "राज्यातील महाविकास आघाडी अभेद्य आहे. शिवसेना संकटात असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही सोबत आहेत. त्यामुळे भविष्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे. विधानसभा आणि लोकसभेला आघाडी करायची की नाही, हे त्यावेळेला ठरविले जाईल. सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचा आमदार निवडून येणार, हे सत्य असून ते लवकरच दिसून येईल. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घटक पक्षांशी चर्चा करून रणनीती ठरविली जाईल.
राज्यातील सध्याच्या सरकारने महाराष्ट्रातील अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती या सगळ्या घटकांसाठी ठाकरे सरकारने जी निधीची तरतूद केली होती, जी लोकाभिमुख कामे सुचविली होती, त्या सर्व कामांना स्थगिती दिली. गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे काम करण्याची रणनीती आताच्या राज्य सरकारने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सरकारकडून गोरगरिबांना न्याय मिळण्याची शक्यता नाही. एवढे महिने होऊनही पालकमंत्री नेमलेले नसल्याने ग्रामीण भागातील विविध योजनांचा निधी अखर्चित राहिला आहे. वेळेत कामे मार्गी न लागल्याने सर्वसामान्यांची परवड झाली आहे.’’
..............
राज्यपालांकडून पदास काळिमा
राज्यपाल हे पद संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे; मात्र या पदाला न शोभणारे कृत्य सध्या महाराष्ट्रात होत आहे. सत्ताधारी पक्षाच्यावतीने केवळ अंगठा उमटविण्याचे काम सध्याचे राज्यपाल करत असल्याची चर्चा राज्यातील जनतेमध्ये आहे. राज्यपालांची उच्च विचारसरणी आणि निःपक्षपणे काम करण्याची जी पद्धत होती, तिला काळिमा फासण्याचे काम राज्यपालांनी केले आहे, अशी टीका राऊतांनी केली.
...............
गणरायाचरणी साकडे
गद्दार, बेईमान, बदमाश वृत्ती वाढत चालली असून या वृत्तीला तू धडा शिकव. प्रामाणिकपणे काम करणारे, सेवा करणाऱ्या भक्तमंडळीला आधार दे, त्यांचे रक्षण कर, असे साकडे गणरायाच्या चरणी घातल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94283 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..