वॉटर एटीएम कोणाच्या फायद्याचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वॉटर एटीएम कोणाच्या फायद्याचे?
वॉटर एटीएम कोणाच्या फायद्याचे?

वॉटर एटीएम कोणाच्या फायद्याचे?

sakal_logo
By

48774
वेंगुर्ले ः शहरात बंद असलेले वॉटर एटीएम.

वॉटर एटीएम कोणाच्या फायद्याचे?
अॅड. मनीष सातार्डेकर ः वेंगुर्लेप्रश्नी पालिका प्रशासनावर टीका

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ ः येथील पालिकेमार्फत लाखो रुपये खर्च करून शहरामध्ये शुद्ध पाण्यासाठी ''स्वच्छ भारत स्वच्छ जल'' अंतर्गत बसविलेल्या वॉटर एटीएम मशीन काही दिवसातच बंद पडल्या आहेत. त्यामुळे हे मशीन नेमके कोणाच्या फायद्यासाठी बसविलेले होते, असा प्रश्न वेंगुर्लेवासीयांना पडला आहे. या वॉटर एटीएमच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा चुराडा केल्या असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनीष सातार्डेकर यांनी केला आहे.
शहरवासीयांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने पालिकेने ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करून वॉटर एटीएम बसविले आहेत; मात्र हे एटीएम काही दिवसांतच बंद पडल्याने वेंगुर्लेवासीयांना शुद्ध पाणी देण्याचा हेतूच अशुद्ध झाला. त्यामुळे हे वॉटर एटीएम मशीन नेमके कोणाच्या फायद्यासाठी बसवले होते, तसेच ज्या कंपनीकडून या वॉटर एटीएम खरेदी केल्या, त्या कंपनींवर कोणती कार्यवाही केली, याचे उत्तर पालिकेने देणे अपेक्षित आहे. ज्या कंपनीकडून व ठेकेदाराकडून या वॉटर एटीएम मशीन खरेदी करण्यात आल्या, त्यांच्यावर आणि या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असणाऱ्यांवर पालिकेने तत्काळ कायदेशीर कार्यवाही करावी. तसे न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही अॅड. सातार्डेकर यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94284 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..