रत्नागिरीत डिफेन्स कौन्सिल कार्यालय होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत डिफेन्स कौन्सिल कार्यालय होणार
रत्नागिरीत डिफेन्स कौन्सिल कार्यालय होणार

रत्नागिरीत डिफेन्स कौन्सिल कार्यालय होणार

sakal_logo
By

रत्नागिरीत डिफेन्स कौन्सिल कार्यालय होणार
रत्नागिरी, ता. ७ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते २१ ऑगस्ट २०२२ कायदेशीर साहाय्य संरक्षण समुदेशक उपक्रमाचे देशव्यापी उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी २२ राज्यात ३६५ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक अर्थात डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. रत्नागिरीत लवकरच या कार्यालयाची सुरवात होणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश ए. एन. कुलकर्णी यांनी दिली. या कार्यालयासाठी रत्नागिरी जिल्ह्याकरिता एक मुख्य कायदेशीर साहाय्य संरक्षण समुपदेशक, एक उपमुख्य व तीन सहाय्यक कायदेशीर साहाय्य संरक्षण समुपदेशकाची भरती करण्यात येणार आहे. या पदांकरिता अर्जांचे नमुने जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच पदांकरिता अर्ज विधी सेवा प्राधिकरण कार्यालयास सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२२ सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94290 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..