रत्नागिरी-जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर
रत्नागिरी-जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर

रत्नागिरी-जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर

sakal_logo
By

जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
---
आचारसंहिता लागू; १३ ऑक्टोबरला मतदान
रत्नागिरी, ता. ७ ः ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला मतदान होईल. यात जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचे निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले.
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील एक हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला. यात संबंधित तालुक्यातील तहसीलदार १३ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुटीमुळे २४ व २५ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. याची छाननी २८ सप्टेंबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरला दुपारी तीनपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १३ ऑक्टोबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी १४ ऑक्टोबरला होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा ठेवायच्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३, रत्नागिरी- ४, लांजा- १५ व राजापूर- १० यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाची धामधूम संपत आली असतानाच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी सुरू होईल. राज्यात शिवसेनेत सुरू असलेल्या ठाकरे-शिंदे गटातील वादाचा परिणामही या निवडणुकीत दिसून येणार आहे. शिंदे गटात असलेले आमदार योगेश कदम यांच्या विधानसभा मतदारसंघात १३, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघातील चार ग्रामपंचायतींत चुरस पाहायला मिळेल. या ठिकाणी शिंदे सेना बाजी मारणार की ठाकरे सेना याकडे सर्वांचेच लक्ष लागेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94302 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..