चिकन मटन मासळीची दरवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिकन मटन मासळीची दरवाढ
चिकन मटन मासळीची दरवाढ

चिकन मटन मासळीची दरवाढ

sakal_logo
By

चिकन मटन
मासळीची दरवाढ
कनेडीः सण उत्सव संपत आल्याने आता ग्राहकांनी मांसाहाराला पंसती दिली आहे. परिणामी चिकन, मटन आणि मासळीच्या दरात वाढ झाली आहे. नेट चिकनचा दर किलोला २०० रूपये झाला आहे. तर मटन ६०० ते ८०० रूपये किलोने विकले जात आहे. बाजारात सागरी मासे विक्रीसाठी येत आहे. मासळीमंध्ये बागडा ३५० रूपये किलोने विकला जात आहे. सुरमय, पापलेटचा दर वाढला आहे.
----
फोंडाघाट परिसराला
पावसाने झोडपले
फोंडाघाटः येथील परिसराला गेले दोन दिवस पावसाने झोडपले. त्यामुळे परिसरातील रस्त्यावर पाणी आले आहे. पावसामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. शेतीला पाणी पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
-----------------
कोल्हापुर पुणे
मार्गे मुंबई प्रवास
कणकवलीः मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडल्याने मुंबईच्या प्रवाशांना आपला मार्ग बदलण्याची वेळ आली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे चाकरणान्यांनी १२ ते १४ तास प्रवास करण्याची वेळ आली आहे. यामुळे परतीच्या प्रवासासाठी कोल्हापूर पुणेमार्गे मुंबई असा करीत आहेत. यामुळे वाहनचालकांना आर्थिक भुदंर्ड सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्याचे काम रखडले आहे. चिपळूण ते राजपूर असा एकेरी मार्ग आहे. तर रायगड जिल्हातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94432 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..