नांदगावला मुसळधार पावसाचा तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगावला मुसळधार पावसाचा तडाखा
नांदगावला मुसळधार पावसाचा तडाखा

नांदगावला मुसळधार पावसाचा तडाखा

sakal_logo
By

swt89.jpg
48923
नांदगाव ः मुसळधार पावसामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले.
swt8.jpg
48904
नांदगाव ः संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर झाडाच्या फांद्या टाकून रास्ता रोको केला.

नांदगावला मुसळधार पावसाचा तडाखा
घरे, रस्ते जलमयः शेती पाण्याखाली, विद्युत उपकरणांचेही नुकसान
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ८ः नांदगाव परिसरातील गावांमध्ये बुधवारी (ता. ७) दुपारनंतर मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदीनाल्यांसह महामार्गालगतची गटारे तुडुंब भरल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तर रस्त्यांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. विजेची झळ बसल्याने अनेकांची विद्युत उपकरणेही नादुरुस्त झाली. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर भरपावसात रास्ता रोको'' करत प्राधिकरण व ठेकेदार कंपनीचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.
हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर नांदगावसह परिसरात बुधवारी दुपारनंतर ढगफुटी सदृश पाऊस झाला. नांदगाव-बिडयेवाडी येथील मनोहर बिडये यांच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून पाणी भरले असताना यावर्षीही याबाबत कोणतीही उपायोजना न केल्याने पुन्हा एकदा त्यांच्या घरात पाणी घुसले. संबंधित विभागांच्या या बेजबाबदारपणामुळे संतप्त नागरिकांनी महामार्गाच्या दोन्ही बाजू अडवून धरत ''रास्ता रोको'' केला. यावेळी मनोहर बिडये, सचिन बिडये, मारुती बिडये, सूरज बिडये, महेश बिडये, कमलेश मोदी, पूजा बिडये, मानसी बिडये, जय बिडये, केदार खोत, संकेत बिडये, गुरुनाथ मोरये, विठ्ठल बिडये, प्रवीण मोरये, सागर म्हाडगुत आदी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर कणकवली पोलिस ठाणे आणि कासार्डे दूरक्षेत्रातील पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मुसळधार पावसामुळे परिसरातील ठिकठिकाणच्या पुलांसह भातशेती पाण्याखाली गेली. याचा फटका वाहन चालक आणि शेतकऱ्यांना बसला. तर विजेमुळे अनेकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होऊन नुकसान झाले. गणेशोत्सवानिमित्त परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते; मात्र पावसामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडल्याचे दिसून आले. दरम्यान, येथील मोरीसाठी प्रक्रिया सुरू असून दिवाळीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली.
................
चौकट
कासार्डे पोलिस दूरक्षेत्रात पाणी
नांदगावसह कासार्डे, तोंडवली, बावशी, तळेरे, आयनल, ओटव, सावडाव, कोळोशी, असलदे भागातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणची भातशेती पाण्याखाली गेली. अवघ्या काही वेळाच्या या मुसळधार पावसामुळे गणेशभक्तांचीही चांगलीच दमछाक होऊन त्याचा अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांवर परिणाम झाला आला. कासार्डे येथील पोलिस दूरक्षेत्रातही पाणी घुसून पोलिसांची तारांबळ उडाली.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94442 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..