गणेश सजावट स्पर्धेत नाईक प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश सजावट स्पर्धेत नाईक प्रथम
गणेश सजावट स्पर्धेत नाईक प्रथम

गणेश सजावट स्पर्धेत नाईक प्रथम

sakal_logo
By

swt८६.jpg
४८९४०
माडखोलः उत्कर्ष ग्रुपच्या वतीने सुप्रिया राऊळ हिला आर्थिक मदत देण्यात आली.

गणेश सजावट स्पर्धेत बेबीवाडीतील देसाई प्रथम
उत्कर्ष ग्रुपचा उपक्रमः माडखोलमध्ये बक्षीस वितरण उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ८ ः माडखोल उत्कर्ष ग्रुप आयोजित ऑनलाईन गणेश-सजावट स्पर्धा २०२२ मध्ये बेबीवाडी येथील अनंतराव देसाई यांनी प्रथम, जीजी धुरी व विश्राम आडेलकर यांनी द्वितीय, तर मधुकर राऊळ व कृष्णा पालव यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उतेजनार्थ गुरुनाथ राऊळ आणि ज्ञानेश्वर लाड यांना गौरविण्यात आले.
माडखोल ग्रामदैवत श्री देवी पावणाई मंदिरात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवस्थान मानकरी दत्ताराम राऊळ, शंकर राऊळ, बापू राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, संजय राऊळ, सूर्यकांत राऊळ, विद्यमान सरपंच संजय शिरसाट, सोसायटी चेअरमन जीजी राऊळ, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मसाजी राऊळ, तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ परब, माजी उपसरपंच सुरेश आडेलकर, सहदेव राऊळ, जयवंत राऊळ, सुयोग राऊळ, संजय देसाई, मेघनाथ पालव, माजी पोलिस पाटील लक्ष्मण बरागडे, रमाकांत राऊळ, भिवा राऊळ आदि ग्रामस्थ उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३१११, २१११, १५११ रुपये, तर उत्तेजनार्थ १००१ रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून माडखोल उत्कर्ष ग्रुपच्या वतीने गावातील निराधार युवती सुप्रिया राऊळ हिला आर्थिक मदत देण्यात आली. या संदर्भात ग्रुपने केलेल्या आवाहनास प्रतिसाद मिळून जमा झालेले रोख ३७,००० रुपये तिच्याकडे सुपुर्द करण्यात आले. माडखोल-धुरीवाडीतील जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दत्ताराम सावंत, भारतीय सैन्य सेवेत कार्यरत असलेले सैनिक यांचा माडखोल गाव आणि माजी सैनिक संघटनेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सुरेश आडेलकर यांनी तर सूत्रसंचालन लखन आडेलकर यांनी केले. आभार प्रमोद राऊळ यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94447 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..