''नाच ग घुमा, कशी मी नाचू? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''नाच ग घुमा, कशी मी नाचू?
''नाच ग घुमा, कशी मी नाचू?

''नाच ग घुमा, कशी मी नाचू?

sakal_logo
By

swt814.jpg
48908
वेताळबांबर्डेः येथील स्नेहा दळवी यांच्या दळवीचा राजा गणपतीसमोर करिश्मा दळवी हिने पत्रावळीपासून साकारलेली गणेश सजावट लक्षवेधी ठरत आहे.
swt815.jpg
48909
वेताळबांबर्डेः येथील सातेरी महिला मंडळ. (छायाचित्रे ः अजय सावंत)


‘नाच ग घुमा, कशी मी नाचू?
फुगड्यांचे सादरीकरण ः वेताळबांबर्डेत पारंपरिक लोककलेला देताहेत उजाळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः श्रींच्या समोर फुगडी घालण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसून येते ''नाच ग घुमा, कशी मी नाचू?, या गावचा त्या गावचा शिंपी-नाही आला, कशी मी नाचू?'' आदी विविध गाण्यातून मोबाईलच्या जमान्यातही पारंपरिक फुगडी लोककला जिवंत आहे.
कोकणात श्रींचे आगमन होऊन आज दहा दिवस झाले. आपल्याकडे दीड ते अकरा, सतरा ते एकवीस दिवसाचे गणपती मोठया प्रमाणात घरोघरी असतात. गेले दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव भाविकांनी नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने भक्तीमय वातावरणात साजरा केला होता. यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने घरोघरी गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे चैतन्याचे वातावरण दिसत आहे. भजन, आरतीने सारा परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. यामध्ये महिलावर्ग सुद्धा या मंगलमय सोहळ्यात मागे नाहीत. या कालावधीत ग्रामीण भागात श्रींच्या समोर पारंपारिक लोककला फुगडी सादर करून हा सोहळा अधिक द्धीगुणीत करीत आहेत. विविध प्रकारच्या फुगडी सादर केल्या जात आहेत. अशीच एक फुगडी लोककला तालुक्यातील सातेरी महिला मंडळ वेताळबाबर्डे येथील महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या व सकाळ तनिष्कच्या सदस्य सौ. स्नेहा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक लोककलेला उजाळा दिला आहे. या फुगडी लोककलामध्ये सोस्मिता बाबर्डेकर, संजना नाईक, प्रीतम गावडे, शुभदा गावडे, करिश्मा दळवी, गौरवी बाबर्डेकर, विद्या बाबर्डेकर, चंद्रप्रभा गावडे, निधी बाबर्डेकर, युक्ता बाबर्डेकर, मुग्धा बाबर्डेकर, समृध्दी नाईक आदी महिलांनी फुगडीच्या विविध कला साकारल्या.
----------
चौकट
पत्रावळीपासून गणेश आरास
वेताळबाबर्डे येथील स्नेहा दळवी यांच्या दळवीचा राजा गणपतीसमोर त्यांची मुलगी करिश्मा दळवी हिने पत्रावळीपासून साकारलेली गणेश सजावट लक्षवेधी आहे. पत्रावळी, द्रोण याची केलेली सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94448 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..