पिंगुळीतील महालक्ष्मी मंडळ जोपासतेय भजनांची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीतील महालक्ष्मी मंडळ जोपासतेय भजनांची परंपरा
पिंगुळीतील महालक्ष्मी मंडळ जोपासतेय भजनांची परंपरा

पिंगुळीतील महालक्ष्मी मंडळ जोपासतेय भजनांची परंपरा

sakal_logo
By

swt816.jpg
48910
पिंगुळीः पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी भजन मंडळाचे सदस्य. (छायाचित्र ः अजय सावंत)

पिंगुळीतील महालक्ष्मी मंडळ
जोपासतेय भजनांची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ः तालुक्यातील वाघोसेवाडी येथील श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ गेली एकोणीस वर्षे दुपारी आरत्या, तर रात्री भजनांची परंपरा जोपासत असून हे निश्चितच कौतुकास्पद आहे. गावागावात सध्या गणपती उत्सवामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईकर चाकरमानी दाखल झाल्याने घरोघरी हा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून येते. परिसरात आरत्या, भजनांचे सूर घुमत आहेत. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून ही परंपरा सर्वांनीच दिमाखात जोपासली आहे. गणपती उत्सव, दीड, पाच, सात, अकरा, सतरा ते एकवीस दिवसापर्यंत साजरा होतो. टाळ-मृदुंगाच्या तालावर भजन मंडळे, श्री गणेशाच्या चरणी भजन सेवा सादर करीत आहेत. अनेक गावांमध्ये विविध प्रथा असून त्या अनेक वर्षे जोपासल्या जात आहेत.
यामध्ये एक म्हणजे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-वाघोसेवाडी येथील श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ होय. या मंडळाच्या माध्यमातून गेली एकोणीस वर्षे वाडीतील एकूण १५ घरांमध्ये गणेशोत्सवात नित्यनेमाने दुपारी आरती आणि रात्री भजन करून ''श्रीं''ची मनोभावे सेवा केली जाते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे भक्तांच्या आनंदावर मर्यादा आल्या होत्या; मात्र यंदा उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला, असे या मंडळाचे बुवा प्रकाश हळदणकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94450 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..