अन नाखऱ्यातील संशयकल्लोळाला पूर्णविराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन नाखऱ्यातील संशयकल्लोळाला पूर्णविराम
अन नाखऱ्यातील संशयकल्लोळाला पूर्णविराम

अन नाखऱ्यातील संशयकल्लोळाला पूर्णविराम

sakal_logo
By

अन नाखऱ्यातील संशयकल्लोळाला पूर्णविराम

ना देवस्की ना राजकारण; फलकाजवळील वस्तूवरून झालेला गोंधळ निवळला
सकाळ वृत्तसेवा
पावस,ता.११ ः रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने बॅनर लावण्यात आले होते. मात्र बॅनरचा भाग तीन रस्ते म्हणजे त्रिकोण असल्याने एका इसमाने तब्येत बरी होण्यासाठी त्याच्या अंगावरून काढलेल्या वस्तू या बोर्डाच्या जवळ ठेवण्यात आल्यामुळे खळबळ निर्माण झाली होती. मात्र ही देव देवस्की व करणी नसून यात राजकारणाचा काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे संबंधित व्यक्तीच्या आरोग्य करिता केलेला विधी आहे, असे निष्पन्न झाल्याने गावातील राजकीय वातावरण थंड झाले, अन संशयकल्लोळ संपला.
सध्या राज्यामध्ये शिवसेनेमध्ये उभी फुट पडल्यामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात बदलले आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गावांमध्ये शिवसेनेने आम्ही सध्या कसे निष्ठावंत आहोत, याकरिता बॅनरबाजी करण्यात आलेले आहे, तशीच बॅनरबाजी नाखरे बौद्धवाडी फाट्यावर केलेली आहे, या ठिकाणी तीन रस्ते येतात. त्यामुळे अनेक भाविक लोक काही विधी या फाट्यावर करतात. तसाच प्रकार करण्यात आल्याचे उघडकीस आले. मात्र निष्ठावंत शिवसैनिकांचे सध्या महत्त्व कमी झाल्यामुळे त्याला गती प्राप्त व्हावी, याकरिता या बॅनरच्या माध्यमातून आमची संघटना संपवली जात असल्याचे चित्र गावांमध्ये पसरवण्यात आले. परंतु अशा प्रकाराने कोणताही परिणाम होत नाही, असे चर्चिले जात होते. अशा प्रकाराने फरक पडला असता तर पाऊस जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक बॅनरखाली हा विधी केला गेला असता परंतु यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याने शिवसेना विभाग प्रमुख व त्याच्या कार्यकर्त्यांनी राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. एका इसमाने तीन रस्त्यावर त्याच्या श्रद्धेने काही वस्तू रात्रीच्या वेळी ठेवल्या. मात्र जवळच बॅनर असल्यामुळे राजकीय वातावरण निर्माण झाले होते परंतु अखेर चर्चा संपुष्टात आल्या.


चौकट
पोलीस पाटलांचा निर्वाळा
यासंदर्भात नाखरे गावचे पोलीस पाटील श्री सुधीर वाळिंबे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले ‘राज्यामध्ये शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे या गावांमध्ये असलेले अस्तित्व नष्ट केले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांना वाटल्यामुळे या बॅनरचे राजकारण केल्याचे चित्र दिसून आले मात्र प्रत्यक्षात आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही गोष्टीचा उपयोग होत नसल्याने या गोष्टी केल्याचे ग्रामस्थाने सांगितल्यामुळे विनाकारण होत असलेल्या चर्चेला विराम मिळाला. या गोष्टी राजकीय हेतूने केल्या नसल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94493 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..