रत्नागिरी ः शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या व मान्यतांची ईडीमार्फत चौकशी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या व मान्यतांची ईडीमार्फत चौकशी करा
रत्नागिरी ः शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या व मान्यतांची ईडीमार्फत चौकशी करा

रत्नागिरी ः शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या व मान्यतांची ईडीमार्फत चौकशी करा

sakal_logo
By

शिक्षकांच्या बोगस नियुक्त्यांची चौकशी करा
बिरसा फायटर्सची मागणी ; लाखोंची उलाढाल झाल्याचा संशय
रत्नागिरी, ता. ८ ः शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या व मान्यतांची ईडीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुशीलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या आणि मान्यता होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा बोगस नियुक्त्यांमध्ये संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे साटेलोटे असून सुमारे १ हजार कोटी रुपयांहून मोठा हा महाघोटाळा आहे. या प्रकरणात पोलिस अथवा इतर यंत्रणांच्या माध्यमातून नीट चौकशी होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी.राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात चाललेल्या अनागोंदी कारभाराने विद्यार्थी व शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टीईटी घोटाळ्याचे लोण राज्यभर पसरले आहेत. इलाहाबाद व आग्रासारख्या विद्यापीठातून पैशांनी बीएड्च्या पदव्या विकत घेऊन बोगस पदव्यांआधारे लाखो नोकऱ्या बळकावल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. त्या बोगस शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई प्रलंबित आहे. बोगस नियुक्तीधारकांवर कठोर कारवाई होणे, ही आजची काळाची गरज आहे.
राज्यातील शाळांमध्ये शासननिर्णय २ मे २०१२ नंतर बोगस शिक्षक नियुक्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यात संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकसुद्धा शामिल आहेत.

ईडी मार्फत चौकशी करा
शिक्षक नियुक्तीत लाखो रुपयांची उलाढाल झाली असावी, ही एक गंभीर बाब असून यामध्ये नियुक्ती, मान्यता, शालार्थ आयडी प्रकरणात दोषी असलेल्या संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पावरा यांनी शासनाकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94495 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..