आरवली ः रिफायनरीला अल्पसंख्यांक समाजाचा पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरवली ः  रिफायनरीला अल्पसंख्यांक समाजाचा पाठिंबा
आरवली ः रिफायनरीला अल्पसंख्यांक समाजाचा पाठिंबा

आरवली ः रिफायनरीला अल्पसंख्यांक समाजाचा पाठिंबा

sakal_logo
By

रिफायनरीला अल्पसंख्यांक समाजाचा पाठिंबा
जाकीर शेकासन ; उद्योगमंत्रीसामंत यांची भेट घेणार
आरवली, ता. ८ ः राजापूर तालुक्यातील धोपेश्वर-बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरीला मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचा पाठिंबा असून या समाजाला रोजगार मिळण्याच्यादृष्टीने ही रिफायनरी लवकर व्हावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केली आहे.
राजापूर-धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. आम्ही स्थानिक जनतेच्या पाठीशी उभे असून स्थानिक जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा असल्यामुळे राजापूरच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचा विकासाचा कायापालट करणारा प्रकल्प व्हावा अशी आपली सकारात्मक भूमिका आहे. या परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्या सरकारनेही रिफायनरी उभारण्याचे सूतोवाच केले आहे. अनेक सामाजिक संस्थांसह व्यापारी संघटनांनी रिफायनरीच्या उभारणीचे समर्थन केले आहे.
हा प्रकल्प झाल्यावर धोपेश्वर, रानतळे, पन्हळे आदी परिसरातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना रोजगार मिळून आर्थिक विकास होण्यास मदत होणार असल्याने हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची आपण भेट घेणार असल्याचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94500 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..