आरवली ः खोदाई आरवली- माखजन रस्त्याच्या मुळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरवली ः  खोदाई आरवली- माखजन रस्त्याच्या मुळावर
आरवली ः खोदाई आरवली- माखजन रस्त्याच्या मुळावर

आरवली ः खोदाई आरवली- माखजन रस्त्याच्या मुळावर

sakal_logo
By

rat०८५.txt


rat८p८.jpg ः P२२L४८९४६ आरवली ः गडनदी मध्यम पाटबंधारे विभागाच्या कालव्यासाठी खोदाई केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

कालव्यासाठी खोदाईमुळे
आरवली रस्ता खड्ड्यात
परवानगी कशी दिली ;बांधकाम मंत्री चव्हाणांकडे मागणार दाद
आरवली, ता. ८ ः गडनदी मध्यम पाटबंधारे विभागाच्या कालव्यासाठी खोदाई केल्याने आरवली माखजन रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता खोदाईसाठी परवानगी कशी दिली, असा सवाल आता प्रवासी जनतेतून विचारला जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी तक्रार करून त्यांचे लक्ष वेधले आहे.
राजिवली (ता. संगमेश्वर) येथील गडनदी मध्यम पाटबंधारे विभागाच्या धरणातून माखजनपर्यंत पाईप टाकून बंदिस्त कालवा काढण्याचे काम सुरू आहे. कालव्याचे पाईप टाकण्यासाठी आरवली-माखजन या मुख्य रस्त्याची आरवली, बुरंबाड आदी ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. या खोदाईमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे तसेच प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अपरात्री येणाऱ्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. या रस्त्यावर दररोज वर्दळ असते तसेच अवजड वाहने मोठ्या प्रमाणात येतात. वर्दळीचा रस्ता असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येत नाही. नागरिकांना रात्री-अपरात्री जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याबाबत सार्वजनिक बांधकामखात्याचे मंत्री चव्हाण यांच्याकडे शेकासन यांनी तक्रार करून त्यांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94503 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..