शिक्षक भरतीसाठी निवड मंडळ हवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक भरतीसाठी निवड मंडळ हवे
शिक्षक भरतीसाठी निवड मंडळ हवे

शिक्षक भरतीसाठी निवड मंडळ हवे

sakal_logo
By

swt८२.jpg
48913
विजय फाले

शिक्षक भरतीसाठी निवड मंडळ हवे
शिक्षण मंत्र्यांकडे मागणीः ८०० रिक्त पदे भरावी
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. ८ ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे ८०० च्या वर रिक्त पदे आहेत. त्या पदांवर स्थानिक डी. एड्. बेरोजगारांना सामावून घ्यावे. तसेच पूर्वीप्रमाणे शिक्षक भरतीसाठी कोकण निवड मंडळाची पुनर्स्थापना करावी, अशी मागणी बेरोजगार युवकांच्या वतीने विजय फाले यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
गेली दहा वर्षे जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याने अनेक डी.टी.एड धारकांचे आयुष्य देशोधडीला लागले आहे. काहींची नोकरीची वयोमर्यादा संपुष्टात येणार आहे. विद्यमान शिक्षणमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे ही तरुणांची तळमळ, खदखद शिक्षण मंत्र्यांनी समजून घ्यावी आणि स्थानिक डी.टी.एड् धारकांची तत्काळ भरती करून स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांची मागणी, विविध शिक्षक भरती आणि सीईटी परीक्षा घोटाळ्यात सिंधुदुर्गचा टक्का नाही. त्यामुळे सिंधुदुर्गमधील भावी शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष बाब डीटीएड़ धारकांना न्याय देण्याची मागणी शिक्षणमंत्री देतील, अशी अपेक्षा बेरोजगारातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, युवकांच्या विशेष बैठकीत असे ठरले की, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता नदी-नाले-ओहोळ व डोंगराळ भाग त्यामुळे वाडीवार प्राथमिक शाळा आहेत. गावातील वाड्यांमध्ये प्राथमिक शाळा असल्याने ग्रामीण भागात मुलांना शिक्षण मिळत आहे; परंतु चालू परिस्थिती पाहता गेल्या दहा वर्षांत कोणतीही भरती प्रक्रिया न झाल्याने प्राथमिक शाळांतील शिक्षकांची पदे रिक्त राहिली आहेत. त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येते. पूर्वी प्राथमिक शिक्षकांची भरती कोकण निवड मंडळामार्फत होत होती. त्यामुळे जिल्ह्यातील डी.एड धारकांना संधी मिळत असे. २००१ पासून राज्यस्तरीय जाहिरात देऊन, सीईटी परीक्षा घेऊन व आता पवित्र पोर्टल मार्फत प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया चालू आहेत. या वेगवेगळ्या प्रक्रिया राबवल्यामुळे राज्यातील घोळ समोर येत आहे. साहजीकच रिक्त पदे वाढत आहेत.
प्राथमिक शिक्षक भरती राज्यस्तरीय झाल्याने परजिल्ह्यातील डी.एड बेरोजगारांचा भरणा सिंधुदुर्गमध्ये अधिक होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार डी.एड धारक बेरोजगार राहिले आहेत. राज्यस्तरीय भरती प्रक्रियेमुळे परजिल्ह्यातील उमेदवार शिक्षक म्हणून सिंधुदुर्गात हजर होतात; मात्र त्यांची बोलीभाषा वेगळी असल्याने त्याचा मुलांच्या अध्ययनावर परिणाम होतो. मुलांची बोलीभाषा बदलते. शिवाय परजिल्ह्यातील शिक्षक इथे दोन ते तीन वर्षे काम करून आंतरजिल्हा प्रक्रियेत आपल्या जिल्ह्यात परत जातात. परिणामी त्याचा प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.
................
चौकट
अन्यथा आंदोलन
सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक व शैक्षणिक रचना पाहता स्थानिकांना प्राधान्य देऊन भरती प्रक्रिया राबवावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दोडामार्ग डी.टी.एड़् संघर्ष समितीने दिला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व डी.टी.एड् धारकांनी एकत्र यावे. अधिक माहितीसाठी विजय फाले, गणपत डांगी यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94506 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..