सिंधुदुर्गात लोक अभिरक्षक कार्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात लोक अभिरक्षक कार्यालय
सिंधुदुर्गात लोक अभिरक्षक कार्यालय

सिंधुदुर्गात लोक अभिरक्षक कार्यालय

sakal_logo
By

नारी शक्ती पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः केंद्राकडून पीडित व संकटात सापडलेच्या महिलांचे, आर्थिक व सामाजिक सबलीकरणाचे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी २०२२ या वर्षासाठी नारी शक्ती पुरस्कारासाठी www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने ३१ ऑक्टोंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण, पारंपारिक व अपारंपारिक क्षेत्रात महिलांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण महिलांना सोयी–सुविधा पुरविणे, विज्ञान व तंत्रज्ञान, खेळ, कला, संस्कृती, महिलांची सुरक्षा, महिलांचे आरोग्य व निरोगीपणा, महिलांचे शिक्षण, कौशल्य विकास या सारख्या अपारंपारिक क्षेत्रात महिलांना प्रात्साहन देणे, महिलांचा आदर व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी केलेले कार्य याकरिता, केंद्राकडून नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रत्येक पुरस्कारासाठी भारत सरकारतर्फे रोख २ लाख रुपये पुरस्कार व प्रशस्तीपत्र दिले जाते. पुरस्कारासाठी पात्रता पुढीलप्रमाणे, फक्त वैयक्तिक कार्याकरिता, नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येते. वैयक्तिक पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणाऱ्या व्यक्तिचे वय १ जुलै २०२२ पर्यत २५ वर्षापेक्षा कमी नसावे.
------------
सिंधुदुर्गात लोक अभिरक्षक कार्यालय
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्लीचे कार्यकारी अधिकारी तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते लोक अभिरक्षक उपक्रमांचे देशव्यापी उद्घाटन करण्यात आले. २२ राज्यांत ३६५ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणअंतर्गत लोक अभिरक्षक अर्थात डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली होती. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असून, जिल्ह्यात लवकरच या कार्यालयाची सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. बी. म्हालटाकर यांनी दिली आहे. या कार्यालयासाठी जिल्ह्यासाठी एक मुख्य लोक अभिरक्षक, सहायक लोक अभिरक्षक ३ यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे कार्यालय जिल्हा न्यायालयात उपलब्ध करुन दिलेल्या प्रशस्त दालनात सुरु होणार आहे. लोक अभिरक्षक कार्यालयात अत्याधुनिक कायदेविषयक माहिती पुरविणारे संगणक, प्रिंटर, स्टेशनरी यांचा पुरवठा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत केला जाणार आहे. या कार्यालयात लिपिक व शिपाई देखील पुरविले जाणार आहेत. या पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. गोरगरीबांना दर्जेदार विधी सेवा पुरविण्यासाठी या कार्यालयाची स्थापना केलेली आहे. तरी जास्तीत जास्त विधीज्ञांनी या पदाकरिता अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात करावेत.
--------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94526 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..