मुसळधार पावसामुळे तोंडवलीत नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळधार पावसामुळे  तोंडवलीत नुकसान
मुसळधार पावसामुळे तोंडवलीत नुकसान

मुसळधार पावसामुळे तोंडवलीत नुकसान

sakal_logo
By

swt820.jpg
49010
तोंडवलीः येथील दत्तमंदिरनजीक कोसळलेली संरक्षण भिंत.

मुसळधार पावसामुळे
तोंडवलीत नुकसान
नांदगाव, ता. ८ः बुधवारी नांदगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तोंडवली येथे अनेकांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्य भिजून गेले. तर चिरेबंदी गडगे जमीनदोस्त झाले; मात्र तलाठी कार्यालयाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यास नकार दिल्याने नुकसानग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली.
नांदगाव परिसरात बुधवारी (ता. ७) दुपारनंतर मुसळधार पाऊस पडला. तोंडवली येथील दत्तमंदिर नजीकच्या नाल्याला नदीचे स्वरूप येऊन पाणी रस्त्यावरून वाहू लागले. काही वेळेतच पावसाने लगतची घरे, गडगे यांना आपल्या विळख्यात घेतल्याने अनेकांचे नुकसान झाले. काही ठिकाणचे चिरेबंदी गडगे जमीनदोस्त झाले, तर पुराचे पाणी घरात शिरून अन्नधान्याचे नुकसान झाले. याबाबत आपल नांदगाव तलाठ्यांशी संपर्क साधला असता ठराविक सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्याने याचा पंचनामा होऊ शकत नाही, असे सांगून नुकसानीचा पंचनामा करण्यास नकार दिला. त्यामुळे नुकसानग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भरपाई नको; पण नोंद तरी करणे गरजेचे होते, असे मत नुकसानग्रस्त नारकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94528 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..