चिपळूण ः कुंभार समाज कोकण कार्याध्यक्षपदी प्रकाश साळवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः कुंभार समाज कोकण कार्याध्यक्षपदी प्रकाश साळवी
चिपळूण ः कुंभार समाज कोकण कार्याध्यक्षपदी प्रकाश साळवी

चिपळूण ः कुंभार समाज कोकण कार्याध्यक्षपदी प्रकाश साळवी

sakal_logo
By

फोटो - ratchl८४.jpg ः L४८९५६ चिपळूण ः कार्याध्यक्षपदाचे पत्र स्वीकारताना प्रकाश साळवी.


कुंभार समाज कोकण कार्याध्यक्षपदी प्रकाश साळवी
कार्याची पावती ः संत गोरा कुंभार पतसंस्था व विकास मंडळाची वार्षिक सभा
चिपळूण, ता. ८ ः खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व कुंभार समाजाचे नेते प्रकाश साळवी यांची कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर यांनी ही निवड जाहीर केली. या निवडीचे पत्र संत गोरा कुंभार नागरी पतसंस्था व संत गोरा कुंभार विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत साळवी यांच्याकडे सुपूर्द केले.
खेर्डी येथील साळवी गेली काही वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. खेर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य व उपसरपंचपद भूषवत त्यांनी गावाच्या विकासात योगदान दिले आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुंभार समाजाच्या माध्यमातून समाजहितासाठी ते गेली काही वर्षे झटत आहेत. रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज सचिव व संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण तालुकाध्यक्षपदाची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे ते समाजबांधवांना सोबत घेऊन समाजहितासाठी विविध उपक्रम राबवतात. जिल्ह्यातील कुंभार समाज एकवटण्यासाठी ते नियमित मेहनत घेत असतात. त्यांच्या पुढाकारानेच खेर्डी येथे १२ हजार समाजबांधवांचा जिल्हा मेळावा झाला होता. पतसंस्था आणि मंडळाच्या माध्यमातून समाजहिताच्या विविध योजना राबवल्या जातात. समाजातील गरजू लोकांच्या अडीअडचणीवेळी ते मदतीला धावून जातात. समाजकार्यात राजकारण न आणता त्यांनी समाज एकसंघ ठेवण्यावर भर दिला. त्यांच्या या कार्याचे फलित म्हणून कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश दरेकर यांनी प्रकाश साळवी यांच्यावर कोकण विभाग कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष महेश सायकर, जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर व ज्येष्ठ नेते कुंभार गुरूजी आदी समाजबांधव उपस्थित होते.

जिल्ह्यातील समाजबांधवांचे मजबूत संघटन होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. संघटनेने आपल्यावरची जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे पार पडण्यासाठी प्रयत्न करू. या पदाच्या माध्यमातून समाजहितासाठी नेहमीच अग्रेसर राहू.
- प्रकाश साळवी, तालुकाध्यक्ष - संत गोरा कुंभार विकास मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94542 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..