खेड ः खेडमध्ये तीन वर्षात 94 हजार क्विंटल तांदळाचे वाटप ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः खेडमध्ये तीन वर्षात 94 हजार क्विंटल तांदळाचे वाटप !
खेड ः खेडमध्ये तीन वर्षात 94 हजार क्विंटल तांदळाचे वाटप !

खेड ः खेडमध्ये तीन वर्षात 94 हजार क्विंटल तांदळाचे वाटप !

sakal_logo
By

खेडमध्ये ३ वर्षात ९४हजार क्विंटल तांदूळ वाटप
अन्नपुरवठा विभाग; जादा धान्याचे मोफत वाटपही
खेड, ता. ११ ः कोरोनाच्या संकटापासून ३ वर्षात येथील तहसील कार्यालयाच्या अन्नपुरवठा विभागाकडून जुलै २०२२ अखेरपर्यंत सुमारे ९४ हजार ८४१ क्विंटल तांदूळ तर ४५ हजार ६६१ क्विंटल गव्हाचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
या धान्याचा अंत्योदय प्राधान्य कुटुंबातील ४१७५ शिधापत्रिकाधारकाला तर प्राधान्य कुटुंबातील १ लाख १६ हजार ७८८ प्रतीव्यक्तीला लाभ मिळाला. सप्टेंबर हा मोफत धान्यवाटपाचा शेवटचा महिना आहे.
कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत केंद्र व राज्य सरकारने रास्तधान्य दुकानांतून नियमित धान्याबरोबरच जादा धान्याचे मोफत वाटप सुरू केले. गेल्या तीन वर्षात शहरातील ५ व ग्रामीण भागातील११२ रास्तधान्य दुकानांच्या माध्यमातून अंत्योदय प्राधान्य कुटुंबातील प्रती शिधापत्रिकाधारकास व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकांमधील प्रतीव्यक्तीस धान्य वितरित करण्यात आले.
२०२०मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३६ हजार ९५४.२३ क्विं. तांदूळ, १२ हजार ३४८.५३ क्विं. गहू वितरण केले. २०२१मधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते डिसेंबरदरम्यान ३१ हजार ५८५.८९ क्विं. तांदूळ, २० हजार ९२५.९७ क्विं. गहूचे तर २०२२ मधील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्य सरकारने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत मोफत धान्य वाटप सुरू ठेवले. जुलै अखेरपर्यंत २६ हजार ३००.६१ क्विं. तांदूळ व १२ हजार ३८६.४३ क्विं. गहू वाटप झाले.
अंत्योदय प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक शहरात ७९ तर ग्रामीण भागात ४ हजार ९६ लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांमध्ये शहरात ७ हजार ८१२ सदस्य, ग्रामीण भागात १ लाख ८ हजार ९७६ लाभार्थी सदस्यांची संख्या आहे. २०२० मधील एप्रिल ते जून महिन्यात अनुक्रमे ६ हजार १२३.५ क्विं., ६ हजार १२३.५ क्विं., ६ हजार २७३.६५ क्विं. तांदूळ वाटप झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94544 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..