बांद्यातील त्याग आंदोलनाची आमदार राणेंकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rane about tyag movement in Banda sindhudurg
बांद्यातील त्याग आंदोलनाची आमदार राणेंकडून दखल

बांद्यातील त्याग आंदोलनाची आमदार राणेंकडून दखल

बांदा : विडंबन करणाऱ्या कापुर कंपनीच्या जाहीरातीविरोधात बांद्यातील रामभक्तांनी गेले वर्षभर सुरु ठेवलेल्या त्याग आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली आहे. बांदा सरपंच अक्रम खान यांनी कणकवली येथे आमदार राणे यांची भेट घेऊऩ त्यांना या त्याग आंदोलनाची संपूर्ण माहिती दिली. कापुर कंपनीच्या विरोधात बांद्यात गेले वर्षभर त्याग आंदोलन सुरु आहे. बांदा पत्रकार तथा श्री विठ्ठल मंदिराचे सेवक आशुतोष भांगले यांनी गेल्यावर्षी सोशल मिडियाद्वारे हे त्याग आंदोलन सुरु केले. त्यांनी स्वत: या कापुराचा वापर बंद केला. जाहीर माफी मागावी अशी मागणी होती.

पुढे हे आंदोलन वाढून बांद्यातील पाच देवस्थाने, १६ व्यापारी व २०० सेवेकरी यात उतरले. बांदा बाजारपेठतील काही व्यापाऱ्यांनी गेले एक वर्ष या कापुराची खरेदी विक्री बंद केली. यंदा चतुर्थीतही एजंटला वीनाऑर्डर माघारी पाठवले. कोणतीही तोडफोड, अपशब्द, बँनरबाजी न करता अगदी कंपनीचे नावही न घेता हे आंदोलन सुरु आहे. ती जाहिरात टीव्हीवर कमी झाली; पण यु ट्युबवर सुरु आहे. कंपनीने अद्याप जाहीर माफी मागितलेली नाही. सरपंच खान यांनी बांदावासियांचा हा विषय आमदार राणे यांच्यासमोर मांडला. आमदार राणे यांनी याची तात्काळ दखल घेतली. या जाहिरातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली व कारवाईचे आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94566 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..