रखडलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचे पुनरुज्जीवन गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रखडलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचे पुनरुज्जीवन गरजेचे
रखडलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचे पुनरुज्जीवन गरजेचे

रखडलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचे पुनरुज्जीवन गरजेचे

sakal_logo
By

प्रस्तावित प्रकल्पांचे पुनरुज्जीवन गरजेचे
रत्नागिरीसाठी उद्योगमंत्र्यांकडून अपेक्षा; आरजीपीपीएल सुरू होणेही आवश्यक
चिपळूण, ता. १०ः शिंदे गटात गेलेल्या रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना उद्योगखाते मिळाले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांना पुनरुज्जीवन मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये विशेषकरून डबघाईला आलेल्या व भवितव्य धूसर बनलेल्या दाभोळच्या आरजीपीपीएल प्रकल्पाचाही समावेश असून यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या अडीच वर्षात ठाकरे सरकार असताना शिवसेनेचे उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांबाबत मोठ्या आशा निर्माण झालेल्या होत्या; मात्र, त्याही फोल ठरल्या. राजापूरच्या नाणार रिफायनरीचेही घोंगडे अजून भिजत पडले आहे. त्यावरही राजकीय कुरघोडी सुरू आहेत. दोन वर्षापूर्वी चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे रोजगार मेळाव्यासाठी आलेल्या युवा सेना नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जवळच असणाऱ्या देवघर, मार्गताम्हाणे परिसरात प्रस्तावित असलेल्या टेक्सटाईल्स प्रकल्पाबाबत घोषणा करून या भागाला दिलासा दिला होता मात्र, अद्यापही या प्रकल्पाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पर्यटनवाढीसाठी तितकीच प्रकल्पांची आवश्यकता असल्याचा त्यांनी स्पष्ट उल्लेखही केला होता.
रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग सोडला तर उर्वरित भागात औद्योगिकीकरण झालेले नाही. पर्यावरणाला पूरक प्रदूषणविरहित प्रकल्प आणणे आजही कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही. काही वर्षांपूर्वी गुहागर तालुक्यातील धोपावे येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्प, त्रिशूळसाखरी येथील जहाजबांधणीचा टिंबलो प्रकल्प, तवसाळपट्ट्यातील ग्रीन रिफायनरी असे विविध प्रकल्प सातत्याने पुढे आले होते; मात्र, हे सर्व प्रकल्प कोणत्या ना कोणत्या कारणांनी बारगळले. देवघर, मार्गताम्हाने येथील विस्तीर्ण माळरान औद्योगिक पट्टा म्हणून नावारूपाला आला होता. येथील भूसंपादनही झाले होते; मात्र, येथे प्रदूषणविरहित प्रकल्प आणण्यात कोणत्याही सरकारला शक्य झालेले नाही.
काही महिन्यांपूर्वी दाभोळच्या आरजीपीपीएल प्रकल्पाचे भवितव्य धूसर बनले आहे. गँसचा अपुरा पुरवठा व महागडा वीजदर यामुळे वीज खरेदी करायला कोणीही पुढे येत नसल्याने वीजनिर्मितीवर परिणाम होऊन प्रकल्प बंद होण्याची शक्यता होती व आजही तशी स्थिती आहे. कर्मचारी कमी केल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अनेक कर्मचाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना प्रकल्प व त्यामधील नोकऱ्या वाचवण्यासाठी साकडे घातले मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

कोट
जिल्ह्याला प्रथमच उद्योगमंत्रिपद आमदार उदय सामंत यांच्या रूपाने मिळाले आहे. उद्योगविश्वातील दांडगा अभ्यास व अनुभव त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा जिल्ह्यातील जनतेला आहेत. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालेली आहे. नोकऱ्यांची कठीण अवस्था आहे. ओसाड जमिनी पडून आहेत. अशावेळी पर्यावरणाला पूरक प्रदूषणविरहित प्रकल्प आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, रखडलेले व प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावावेत व कोकणच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी.
- अजिंक्य आंब्रे, लोटे व्यावसायिक
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94571 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..