चिपळूण ः 5 लाखाच्या गणेशविसर्जन घाटाची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः 5 लाखाच्या गणेशविसर्जन घाटाची दुरवस्था
चिपळूण ः 5 लाखाच्या गणेशविसर्जन घाटाची दुरवस्था

चिपळूण ः 5 लाखाच्या गणेशविसर्जन घाटाची दुरवस्था

sakal_logo
By

फोटो - ratchl८३.jpg ःKOP22L48966 चिपळूण ः पोसरे येथील गणेश विसर्जन घाटाची झालेली दुरवस्था.


पोसरेतील गणेशविसर्जन घाटाची दुरवस्था
पहिल्याच पावसांत लाद्या उखडल्या ; दुरुस्तीच्या सूचनांकडे दुर्लक्ष
चिपळूण, ता. ८ ः तालुक्यातील पोसरे येथे ग्रामस्थांच्या सोयीसाठी ५ लाख रुपये खर्चून गणेशविसर्जन घाट बांधण्यात आला; मात्र पावसाळ्यात हा घाट उखडला. गणेशाचे विसर्जन झाले तरी या घाटाची दुरुस्ती झालेली नाही.
गावागावांतून विकासकामे मंजूर केली जातात; मात्र ती नेमकी कुणाच्या फायद्यासाठी असतात, असा सवाल तालुक्यातील पोसरे येथे पावसाळ्यापूर्वी पाच लाख खर्चून बांधण्यात आलेल्या गणेश विसर्जन घाटाची सद्यस्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. पहिल्याच पावसांत घाटाची लादी उखडून गेल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. खाडीपट्ट्यातील पोसरे येथील ग्रामस्थांना गणपती विसर्जनाची व्यवस्था चांगली मिळावी म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पंधराव्या वित्त आयोगातून पाच लाखाचा निधी गणेश विसर्जन घाटासाठी मंजूर केला. त्यानंतर नियुक्त ठेकेदाराने मार्च महिन्यात काम पूर्ण केले. काम सुरू असतानाच दर्जाबाबत ग्रामस्थांनी शंका घेतली होती. संबंधित कामाची बिले राजकीय वजन वापरून काढण्यात आली का अशी शंका व्यक्त होत आहे.
दीड महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत गणपती विसर्जनापूर्वीच या घाटाच्या लाद्या पूर्णपणे उखडल्या. जाण्या-येण्यासाठी अडचण नको म्हणून लाद्या ग्रामस्थांनी एकत्र करून ठेवल्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागास माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. संबंधित ठेकेदारास गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या; मात्र अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. संबंधितांना राजकीय वरदहस्त असल्याने कारवाईचा पत्ता नाही. शिवाय दुरुस्तीचे कामही लांबणीवर पडले आहे. पावसाळ्यानंतरच हे काम होण्याची शक्यता आहे. राजकीय वरदहस्तामुळे अशी कामे होणार असतील तर त्याचा उपयोग काय, ती नेमकी कुणासाठी? अशा प्रतिक्रियाही ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94576 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..