Weather Update : तीन दिवसासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अर्लट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update monsoon rain forecast orange alert in ratnagiri
रत्नागिरी ः तीन दिवसासाठी जिल्ह्याला ऑरेंज अर्लट

Weather Update : तीन दिवसासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अर्लट

रत्नागिरी : गौरी-गणपती विसजर्नानंतर दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात पावसाचे दमदान आगमन झाले; मात्र हा जोर एक दिवसाचाच ठरला. पुन्हा कडकडीत ऊन आणि अधूनमधून एखादी सर अशी परिस्थिती सगळीकडे आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसासाठी जिल्ह्याला ऑरेंज अर्लट दिला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी २०.५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड १५, दापोली १७, खेड २६, गुहागर ४०, चिपळूण १३, संगमेश्‍वर २, रत्नागिरी ७, लांजा १९ आणि राजापूर ४६ मिमी नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३ हजार ५६ मिमी पाऊस झाला आहे.

गतवर्षी याच कालावधीत ३ हजार ७८७ मिमी पाऊस झाला होता. तुलनेत ७०० मिमी कमी पाऊस पडला आहे. दिवसातून एखादी सर पडत असली तरीही भातशेतीला पुरेसे पाणी अजूनही मिळालेले नाही. त्याचा परिणाम कातळावरील सुमारे दहा हजार हेक्टरवरील भातशेतीला बसू शकतो. रोपं पिवळी पडणे, करपून जाणे यासारखे प्रकार घडू शकतात. हवामान विभागाकडून दिलेल्या सूचनेनुसार, जिल्ह्यात ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मासेमारीसाठी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा व तालुका नियंत्रण कक्षास संपर्क साधावा.

दरडप्रवण व पूरप्रवण क्षेत्रात राहणार्‍यांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल आदी ठिकाणी जाऊ नये. अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले परिसरात प्रवास करू नये. अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे होत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता असते. त्यामुळे वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घ्यावी,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सेल्फी काढू नका
पुराच्या पाण्यात समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94591 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..