सापाच्या दंशाने मांजराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सापाच्या दंशाने मांजराचा मृत्यू
सापाच्या दंशाने मांजराचा मृत्यू

सापाच्या दंशाने मांजराचा मृत्यू

sakal_logo
By

swt830.jpg
L49043
सावंतवाडी ः सर्पमित्र योगेश वेंगुर्लेकर यांनी पकडलेला साप.

सापाच्या दंशाने मांजराचा मृत्यू
सावंतवाडी, ता. ८ ः येथील सबनिसवाडा परिसरातील रहिवाशी राजन मालवणकर यांच्या घरात आज साप आढळून आला. या सापाने मालवणकर यांच्या मांजरास दंश केला. याची माहिती सर्पमित्र योगेश वेंगुर्लेकर यांना देण्यात आली. सर्पमित्र वेंगुर्लेकर यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. मात्र, संर्पदंश झालेल्या मांजराचा मृत्यू झाला. हा प्रकार आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडला. हा साप साधारणतः तीन फूट लांबीचा होता. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने असे प्राणी घरात घुसण्याचे प्रकार घडत असून सतर्कता बाळगण्याचे आवाहन सर्पमित्र वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
----------
swt829.jpg
49042
गोवाः दोडामार्ग तालुक्यातील यशस्वी कराटेपटू. सोबत प्रशिक्षक

दोडामार्गातील कराटेपटुंचे
गोव्यात उज्ज्वल यश
दोडामार्ग, ता. ८ ः गोवा बोरी येथील मनुराय नाईक यांच्या गोवा कराटे व फिटनेस सेंटरतर्फे आयोजित केलेल्या कराटे स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील कराटेपटुंनी उज्ज्वल यश मिळवले आहे. कराटे स्पर्धा बोरी शिरशिरे येथील स्वामी विवेकानंद विदयालयाच्या हॉलमध्ये घेण्यात आली. या कराटे स्पर्धेत गोवा राज्यातील सुमारे चारशेहून अधिक कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील कराटेपटूही सहभागी झाले होते. स्पर्धेत रिमिजिश गवस, इझिकल फर्नाडिस, निधी अडिलकर ( तिघांनाही सुवर्ण पदक ), श्रीनिती मणेरीकर, सानिका दांगे, नील गवस (दोघांना रौप्य) दत्तप्रसाद परब (कांस्य पदक). या सर्वांना मुख्य प्रशिक्षक प्रशीतन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. बक्षीस वितरण शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे संस्थापक-मीनानाथ उपाध्ये, स्वामी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य सुब्रमण्यम भट, पत्रकार शामिनी मडकइकर व कृष्णा नाईक, ब्रम्हानंद सावर्डेकर, विष्णू नाईक, उदय कुमार, दत्तप्रसाद सांगेकर, मंदार गणफुले, संतोष नाईक, दत्ता नाईक आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94614 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..