उंबर्डेत पुन्हा मोरीला भगदाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंबर्डेत पुन्हा मोरीला भगदाड
उंबर्डेत पुन्हा मोरीला भगदाड

उंबर्डेत पुन्हा मोरीला भगदाड

sakal_logo
By

swt831.jpg
49044
उंबर्डेः अतिवृष्टीमुळे बौध्दवाडी येथील विहीर कोसळली.
swt832.jpg
49045
उंबर्डेः खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील कुंभारवाडी येथे मोरीला पुन्हा भगदाड पडले.

उंबर्डेत पुन्हा मोरीला भगदाड
वाहतुक विस्कळीतः बौध्दवाडीत विहीरही कोसळली
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील उंबर्डे-कुंभारवाडी येथे पुन्हा मोरीला भगदाड पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, काल (ता. ७) झालेल्या मुसळधार पावसामुळे उंबर्डे-बौध्दवाडी येथील नळपाणी योजनेची विहीर कोसळली. त्यामुळे बौध्दवाडीतील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उंबर्डे-कुंभारवाडी येथील मोरीला २० ऑगस्टला भगदाड पडले होते. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. ऐन गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करीत वाहतूक सुरळीत केली होती; परंतु काल रात्री पुन्हा त्याच ठिकाणी मोरीला भगदाड पडले. त्यामुळे त्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुरक्षिततेचा पर्याय म्हणून भगदाड पडलेल्या ठिकाणी बॅरेल लावण्यात आलेली आहेत.
तालुक्यात काल सायकांळी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अनेक गावांना झोडपून काढले. पावसामुळे उंबर्डे-बौध्दवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेची विहीर कोसळली. यात योजनेचा मोटरपंप आणि इतर साहित्य विहिरीत गाडले गेले. या विहिरीवरून बौध्दवाडी येथील 100 कुटुंबांना पाणीपुरवठा सुरू होता. आता विहीर कोसळल्यामुळे या कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरीच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात सरपंच एस. एम. बोबडे यांच्याशी सपंर्क साधला असता त्यांनी पूरहानी किवा जलजीवन मिशनमधून या विहिरीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देखील विहीर कोसळल्याची माहीती देण्यात आली आहे, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94617 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..