‘साहित्यश्री’ पुरस्कार उद्या देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘साहित्यश्री’ पुरस्कार उद्या देणार
‘साहित्यश्री’ पुरस्कार उद्या देणार

‘साहित्यश्री’ पुरस्कार उद्या देणार

sakal_logo
By

सुमेध वडावाला (रिसबूड) यांना
‘साहित्यश्री’ पुरस्कार उद्या देणार
रत्नागिरी, ता. ८ ः कथा, कादंबरी, आत्मकज्ञा या साहित्य प्रकारात स्वतःच्या लेखनाचा ठसा उमटवलेल्या सुमेध वडावाला (रिसबूड) यांना त्यांच्या बहूविध, दर्जेदार लेखनाबद्दल युवक बिरादरी या ख्यातनाम संघटनेने ‘साहित्यश्री’ पुरस्कार देण्याचे घोषित केले आहे. हा पुरस्कार बिरादरी ॠणानुबंध समारोह या विशेष विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी (ता. १०) मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित केला आहे. आजवर सुमेध यांची ३३ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. खेड हे त्यांचे जन्मगाव. ते मुंबई निवासी आहेत. विविध वृत्तपत्रातूनही त्यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांना दोनवेळा महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार, शांताराम सर्वोत्तम कथा पुरस्कार, श्री. दा. पानवलकर पुरस्कार, राजेंद्र बनट्टी पुरस्कार तसेच मसापचा आनंदीबाई शिर्के असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94630 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..