नऊ दिवसांच्या बाप्पांना कुडाळात भक्तीमय निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऊ दिवसांच्या बाप्पांना कुडाळात भक्तीमय निरोप
नऊ दिवसांच्या बाप्पांना कुडाळात भक्तीमय निरोप

नऊ दिवसांच्या बाप्पांना कुडाळात भक्तीमय निरोप

sakal_logo
By

swt835.jpg
49070
पिंगुळीः शेटकरवाडी येथे नऊ दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. (छायाचित्रः अजय सावंत)

नऊ दिवसांच्या बाप्पांना
कुडाळात भक्तीमय निरोप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'', ''गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला'', ''गणपती मोरया पुढच्या वर्षी लवकर या'' असा जयघोष करून ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत कुडाळ तालुक्यात नऊ दिवसांच्या गणरायांचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
कुडाळ शहरासह ग्रामीण भागात फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. नदी, तलाव, ओहोळ आदी ठिकठिकाणी नऊ दिवसांच्या गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेश घाटाच्या ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपर्यंत गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू होता. गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात बाप्पांना वाजतगाजत निरोप दिला. ''श्री''च्या सर्व आरत्या, गाऱ्हाणे आदींनी परिसर भक्तीमय झाला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94662 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..