‘सिंधुदुर्ग राजा’ला भावपूर्ण निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिंधुदुर्ग राजा’ला भावपूर्ण निरोप
‘सिंधुदुर्ग राजा’ला भावपूर्ण निरोप

‘सिंधुदुर्ग राजा’ला भावपूर्ण निरोप

sakal_logo
By

49135
कुडाळ ः सिंधुदुर्ग राजाच्या विसर्जनावेळी उपस्थित भाविक. (छायाचित्र ः अजय सावंत)


साश्रूनयनांनी ‘सिंधुदुर्ग राजा’ला कुडाळवासीयांकडून निरोप

कुडाळ, ता. १० ः माजी खासदार नीलेश राणे व राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात पार पडली. गेली दहा दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. विविध सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राजाच्या दरबारात घेण्यात आले.
कुडाळ पोस्ट ऑफिसनजीकच्या सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडपातून मिरवणुकीला सुरवात झाली. कुडाळ पोस्ट ऑफिस, जिजामाता चौक, गांधी चौक मार्ग भैरवाडी, काळप नाका ते पावशी तलावपर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीसह मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते ‘राजा’ची उत्तर पूजा झाली. पावशी येथील तलावाच्या ठिकाणी ‘सिंधुदुर्ग राजा’चे थाटात विसर्जन झाले. यावेळी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, युवा नेते आनंद शिरवलकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, संदीप मेस्त्री, दामू तोडणकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, अॅड. राजीव कुडाळकर, निलेश परब, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, विश्वस्त राकेश नेमळेकर, माजी नगरसेवक आबा धडाम, सुनिल बांदेकर, साक्षी सावंत, रेखा काणेकर, नागेश नेमळेकर, रुपेश बिडये, साईनाथ म्हाडदळकर, मुन्ना दळवी, चंदन कांबळी, साईनाथ दळवी, स्वरूप वाळके, प्रथमेश कुडाळकर, आकाश पिंगुळकर, प्रथमेश परब, संदेश सुकळवाडकर, अक्षय बाईत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94768 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..