अवैध धंद्यांना आळा घाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध धंद्यांना आळा घाला
अवैध धंद्यांना आळा घाला

अवैध धंद्यांना आळा घाला

sakal_logo
By

49137
सावंतवाडी ः येथील पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत करताना मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार आदी.


अवैध धंद्यांना आळा घाला

मनसेची मागणी; सावंतवाडी पोलिसांचे वेधले लक्ष

सावंतवाडी, ता. १० ः तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने धडक कारवाई करावी, सोनुर्ली येथील चोरी प्रकरणातील मोकाट फिरत असलेला चोरट्यांना तत्काळ गजाआड करा, अशी मागणी सावंतवाडी मनसेच्यावतीने नूतन पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे केली. श्री. मेंगडे यांची सावंतवाडी शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक, सचिव कौस्तुभ नाईक, मनविसे तालुकाध्यक्ष ओंकार कुडतरकर, मुकुंद धारगळकर, प्रवीण गवस, सर्वेश तेली, आदित्य कुडतरकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. सुभेदार म्हणाले की, अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी. शहरात सध्या चोऱ्या, घरफोड्याचे प्रमाण वाढले आहे. त्यादृष्टीने रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्ती पथकात वाढ करावी. सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिरात चोरी होऊन सोळा दिवस पूर्ण होत आले तरी चोरीचा छडा लागलेला नाही. चोरटे अद्याप मोकाट आहेत. त्यांना तातडीने अटक करावी. दरम्यान, श्री. मेंगडे यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. सोनुर्ली माऊली मंदिर चोरी प्रकरणी तपास सुरू आहे. शहरात रात्रीच्या वेळी चार पोलिसांचे गस्ती पथक तैनात केली आहेत, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94772 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..