संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

सकारात्मक विचारांनी व्हिजनचे
उपक्रम यशस्वी करुया ः बळवंतराव
गावतळे,ता.११ ः सकारात्मक विचारानीच व्हिजन दापोलीचे उपक्रम यशस्वी करूया असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी केले. सन २०२२/२३ शैक्षणिक वर्षे व्हिजन दापोली उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्य समितीची नियोजन सभा छत्रपती शिवाजीमहाराज सभागृह येथे २ दिवसापूर्वी पार पडली त्या प्रसंगी तेबोलत होते. गेल्या पाच वर्षाचा आढावा घेत, चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीसह, मुलाखत, ज्ञानकुंभ, अल्फाबेट हजेरी आदि.उपक्रम सकारात्मक विचारांनी यशस्वी करुया, असे आवाहन करत,बळवंतराव यांनी सातत्य ठेऊन व्हिजनचे उपक्रम यशस्वीपणे राबवून तालुक्याचा गौरव वाढवुया,असे सांगितले.यावेळी १५ सप्टेंबरला समित्यांची कार्यशाळा टाळसुरे येथे तर मराठी व उर्दू माध्यमाच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांच्या कार्यशाळासुध्दा सप्टेंबरमध्ये घेण्याचे नियोजन करणेत आले. व्हीडीएस ४ च्या यशस्वी १०६ विद्यार्थ्यांसह सदर परीक्षेत वर्गातील सर्व मुले बसवून ५० टक्केच्या वर निकाल देणाऱ्या शाळांचाही तालुकास्तरावर सत्कार होणार असून यामध्ये शिष्यवृत्ती मार्गदर्शनही करणेत येणार असल्याचे सुनिल कारखेले यानी नियोजन समिती निर्माण करतांना सांगितले. यावेळी मुख्यसमिती, सर्व विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94791 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..