जोशी विद्यामंदिरमध्ये बक्षीस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोशी विद्यामंदिरमध्ये बक्षीस वितरण
जोशी विद्यामंदिरमध्ये बक्षीस वितरण

जोशी विद्यामंदिरमध्ये बक्षीस वितरण

sakal_logo
By

rat10p8.jpg
49143
रत्नागिरी : मालतीबाई जोशी विद्यामंदिरात श्री. व सौ. गोरे यांचा सत्कार करताना शालेय समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर.

जोशी विद्यामंदिरमध्ये बक्षीस वितरण
रत्नागिरी : (कै.) मालतीबाई जोशी विद्यामंदिरात विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी सुमित गोरे याने शाळेला दहा हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे शालेय समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, सत्कारमूर्ती श्री. व सौ. गोरे उपस्थित होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या घटक संस्थांतर्गत पठण स्पर्धेतील, हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेतील, रत्नागिरी नगरपालिका आयोजित लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या वेळी प्रातिनिधीक स्वरूपात पठण स्पर्धेतील विजयी साईराज मडके याने गीताई श्लोक, वक्तृत्व स्पर्धेतील विजयी अक्षरा खामकर हिने भाषण केले. माजी विद्यार्थी सुमित गोरे याने दिलेल्या देणगीतून शाळेसाठी स्पीकर सिस्टीम घेण्यात आली. त्याचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. केळकर यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन माईणकर व मुख्याध्यापक गार्डी यांनी केले. श्री. पांचाळ यांनी आभार मानले.
--
तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सावंत
रत्नागिरी : तालुक्यातील गडनरळ, कोळीसरे व वैद्य लावगण ग्रुप ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मंगेश सावंत यांची नियुक्ती केली आहे. मंगेश सावंत यांनी गडनरळ येथील बौद्धजन पंचायत समिती गावशाखेचे माजी पदाधिकारी म्हणून काम केले आहे. बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्या रत्नागिरी कार्यकारिणीवर विद्यमान कोषाध्यक्ष आहेत. या वेळी गडनरळ कोळीसरे वैद्यलावगण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी धनावडे, उपसरपंच संजय सावंत, माजी अध्यक्ष गणपत भुवड, पोलीस पाटील गणपत धनावडे, ग्रामपंचायत सदस्या अंजली सावंत, ग्रामसेवक प्रक्षाळे, राजेंद्र गोताड व ग्रामस्थ उपस्थित होते. सावंत यांचे अभिनंदन तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळ्याचे अध्यक्ष भाई जाधव आदींनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94805 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..