हृदयरोग तज्ज्ञाची गरज ः सूर्याजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयरोग तज्ज्ञाची गरज ः सूर्याजी
हृदयरोग तज्ज्ञाची गरज ः सूर्याजी

हृदयरोग तज्ज्ञाची गरज ः सूर्याजी

sakal_logo
By

49184
देव्या सूर्याजी


सावंतवाडीला हृदयरोग तज्ज्ञ द्या

सूर्याजी ः उपजिल्हा रुग्णालयासाठी मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः येथील उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णालयात कायमस्वरूपी हृदयरोग तज्ज्ञ द्यावा, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचेही त्यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेत असणाऱ्या डॉक्टरांनी कायमस्वरूपी सेवेतून राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांवर उपचार करण्यासाठी फिजीशिएन उपलब्ध नसल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. ‘गोमेकॉ’ शिवाय अन्य पर्याय गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला उपलब्ध नाहीत. खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नाही. आपल्या माध्यमातून दिलेल्या निधीतून रूग्णालतील भौतिक सुविधा व आधुनिकीकरण होत आहे. यंत्र सामुग्री देखील उपलब्ध करून देत आहात; परंतु, अत्यावश्यक फिजीशीएन डॉक्टरच उपलब्ध नसतील तर या सुविधांचा काय उपयोग? त्यामुळे या विषयाची गंभीर दखल घेत तातडीने कार्यवाही करावी, कायमस्वरूपी एम.डी. फिजीशीअन उपलब्ध करून द्यावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94814 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..