उपरकरांकडून शहरवासीयांची दिशाभूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपरकरांकडून शहरवासीयांची दिशाभूल
उपरकरांकडून शहरवासीयांची दिशाभूल

उपरकरांकडून शहरवासीयांची दिशाभूल

sakal_logo
By

49243
अण्णा कोदे

उपरकरांकडून शहरवासीयांची दिशाभूल

अण्णा कोदे : १९९९ला स्वतःच्या जमिनी वाचवल्या


कणकवली, ता. १० : शहराच्या नियोजन विकास आराखड्याबाबत मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर जनतेशी दिशाभूल करत आहेत. वस्तुतः त्‍यांनी १९९९ मध्ये शहराचा विकास अराखडा तयार होत असताना आपल्‍या जमिनी वाचवल्‍या होत्या, असा आरोप भाजपचे शहरप्रमुख अण्णा कोदे यांनी केला.
कणकवली शहर विकास नियोजन आराखड्याबाबत नुकतीच नगरपंचायतीतर्फे बैठक आयोजित केली होती. या तातडीच्या बैठकीवर श्री. उपरकर यांनी टीका केली होती. या टीकेचा समाचार श्री. कोदे यांनी आज घेतला. ते म्‍हणाले, ‘‘कणकवली शहर विकास आराखड्याबाबतची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने अनेक बैठका पुढील काळात होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेली बैठक नागरिकांनी अभिप्राय कळावावेत, याबाबतच्या जनजागृतीसाठी होती. तसेच शहरवासीयांना, विश्वासात घेऊनच आराखडा तयार करण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्ताधारी नगरसेवक प्रयत्‍न करत आहेत.’’
ते म्‍हणाले, ‘‘शहराचा पहिला विकास आराखडा १९९९ मध्ये जिल्‍हा परिषदेच्या माध्यमातून झाला होता. त्‍यावेळी जिल्‍हा परिषदेमध्ये असलेल्या परशुराम उपरकरांनी आपल्या जागा विकास आराखड्यामध्ये येण्यापासून वाचवल्‍या होत्या. आता नवा आराखडा तयार होत असताना मात्र ते कणकवलीवासीयांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र उपरकरांच्या मनसेला कणकवलीत जनाधार नाही. नगरपंचायत निवडणुकीत मनसेला अवघी १७ मते मिळाली होती. त्‍यामुळे उपरकर यांच्या वक्तव्यावर शहरातील जनता अजिबात विश्‍वास ठेवणार नाही.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94845 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..