मद्याची बाटली घेऊन फिरणाऱ्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मद्याची बाटली घेऊन फिरणाऱ्यावर गुन्हा
मद्याची बाटली घेऊन फिरणाऱ्यावर गुन्हा

मद्याची बाटली घेऊन फिरणाऱ्यावर गुन्हा

sakal_logo
By

संशयितरित्या फिरणाऱ्या एकास अटक
रत्नागिरीः शहराजवळी कुवारबाव येथे एका जनरल स्टोअर दुकानाच्या आडोशाला अंधारात स्वतःला लपविणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जनार्दन रमेश गावीत (वय १९,रा. आंबोडे, ता. सुर्गाना, जि. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांना निदर्शनास आली. पोलसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गावीत हे कुवारबाव बाजारेपठ येथील सुप्रिया किराणा जनरल स्टोअर्स येथे दुकानाच्या आडोशाला पडवेवाडी ते मिरजोळे जाणाऱ्या रस्त्यावर स्वतःला लपवायचा प्रयत्न करीत होता. त्यांच्याकडे घरफोडीचे सामान होते. या प्रकरणी पोलिस नाईक पंकज पडेलकर यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
--------
मद्याची बाटली घेऊन फिरणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशनासाठी देशी दारुची बाटली घेऊन फिरणाऱ्या वृद्ध संशयिताविरुद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर विश्राम खेऊर (वय ६२, रा. भंडारवाडी, मालगुंड, रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचा नाव आहे. ही घटना गुरवारी (ता. ८) रात्री सव्वादहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध मालगुंड भंडारवाडी येथे तारका बार अॅण्ड रेस्टॉरन्टच्या समोर सार्वजनिक ठिकाणी चौकात मद्याची बाटली घेतलेल्या स्थितीत सापडले या प्रकरणी पोलिस शिपाई मधुकर सरगर यांनी जयगड पोलिसात तक्रार दिली.
--------
साळवीस्टॉप येथे दारु विक्रीवर धाड
रत्नागिरी ः शहरातील साळवी स्टॉप-झोपडपट्टी येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर फिकर महाद मुजावर(वय ५१, रा. साळवीस्टॉप, झोपडपट्टी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयिताकडे १५ लिटर ८५५ रुपयांची हातभट्टीची दारु विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत सापडला या प्रकरणी पोलिस हवालदार बाजीराव कदम यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
--------
मद्य बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः मालगुंड-भंडारवाडी येथे ६ लिटर गावठी हातभट्टीची दारु बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकिता विश्वास खेऊर (वय ३३, रा. भंडारवाडा, मालगुंड) असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना गुरवारी (ता. ८) रात्री सव्वादहाच्या सुमारास मालगुंड-भंडारवाडी येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकिता खेउर हिने विनापरवाना हातभट्टीची सहा लिटर दारु विक्री साठी आपल्या बाळगली. या प्रकरणी पोलिस शिपाई मधुकर सरगर यांनी जयगड पोलिसात तक्रार दिली.
------- |
मद्य प्राशनामुळे प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील खानू-शिंदेवाडी येथे पायवाटेवर प्रौढाचा मृतदेह सापडला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुदर्शन गणपत मावळंकर (वय ५०, रा. मावळंगकरवाडी, खानू, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) सकाळी साडेदहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सुदर्शन हा रविवारी (ता.४) रोजी गणपती सणा करिता गावी आला होता. पण घरी न रहाता गावात कोणत्यातरी नातेवाईकांकडे रहात होता. त्याला दारुचे व्यसन होते. दारु पिऊन न जेवता राहिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94847 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..