चिपळुणात 7 तासाहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात 7 तासाहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक
चिपळुणात 7 तासाहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक

चिपळुणात 7 तासाहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक

sakal_logo
By

rat१०p१७.jpg
४९२४५
चिपळूण : शहरातील नागरिक गणेश विसर्जन मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

rat१०p१८.jpg -
४९२४६
नवसाचा महाराजा गणेश मंडळाची मूर्ती विसर्जनासाठी नेताना.
..............
चिपळुणात ७ तास विसर्जन मिरवणूक
बाप्पाला जल्लोषात निरोप; गणेशोत्सव धूमधडाक्यात
चिपळूण, १० : शहाराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता यावर्षी धूमधडाक्यात झाली.गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप चिपळूणमध्ये भक्तानी दिला. गेली २ वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले यावर्षी मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. दोन वर्षाच्या निर्बंधानंतर मिरवणूक होत असल्याने गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला. तब्बल ७ तास काही गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक चालली.
सायंकाळी ज्या गणेश मंडळाच्या निवडणुका वेळेत निघाल्या त्यांच्या गणेश मूर्ती बाजार पुलावर विसर्जित करण्यात आल्या. शहरातील नवसाचा राजा, राहुल गार्डन गणेशोत्सव मंडळ आणि मार्कंडीतील नवसाचा महाराजा या गणेश मंडळाच्या मिरवणुका रात्री उशिरा पण चालल्या. रात्री बारा वाजता गांधारेश्वर येथे या मंडळाच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पहिले नवसाचा राजा या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले. नंतर राहुल गार्डन गणेशोत्सव मंडळ आणि त्याच्यानंतर नवसाचा महाराजा या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. काही वेळ आकाश ढगाळ झाल्याने वरुण राजा बरसतो की काय असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वरुण राजाने दडी मारली. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या दरम्यान गणेश मंडळाच्या मिरवणुकांची सुरुवात झाली.
मुंबई - गोवा महामार्ग, कावीळतळी, चिंचनाका, बाजारपेठेमार्गे या मिरवणुका निघाल्या होत्या त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात बदलही केला होता. जसा जसा दिवस खाली जाऊ लागला तशी तशी गर्दी वाढू लागली. आणि नागरिकांची गर्दीही वाढू लागली. गणेश मंडळाच्या वाजणाऱ्या ढोल पथकाने नागरिकांना डोलायला लावले. ढोल पथकाने ठेका धरला. यावेळी भाविकांत उत्साह संचारला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी झेंडे नाचवले. त्यानंतर गुलालाची उधळण झाली. मोरया टाळ्यांचा गजर झाला. अंधार पडत चालला तसा भाविकांचा आणि ढोल ताशा पथकामध्ये उत्साह वाढत गेला.

चौकट
पुलापर्यंत वाहन नेणे शक्य
नाईक कंपनी येथे गणेश विसर्जन घाटावर बहुतांशी घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बहादुर शेख नाका येथील पुलापर्यंत वाहन घेऊन जाणे शक्य होते. त्यामुळे चार चाकी वाहनातून गणेश भक्त आपल्या मूर्ती विसर्जनासाठी पूला पर्यंत आणत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94848 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..