चिपळूण ः फुटलेल्या गोळ्या का दिल्या याची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः फुटलेल्या गोळ्या का दिल्या याची चौकशी
चिपळूण ः फुटलेल्या गोळ्या का दिल्या याची चौकशी

चिपळूण ः फुटलेल्या गोळ्या का दिल्या याची चौकशी

sakal_logo
By

फुटलेल्या गोळ्या का दिल्या
याची चौकशी होणारः फुले
चिपळूण, ता. १०ः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे येथील बाळासाहेब माटे उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलेली औषधे ही मुदतीतील होती. त्यामुळे ती खराब असण्याचा प्रश्न येत नाही. मात्र फुटलेल्या गोळ्या ( औषधे) का दिल्या याची चौकशी केली जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी याबाबतची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना खराब झालेली औषधे पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. रूग्णांच्या हाती दिलेल्या औषधांच्या बहुतांशी पॅकेटमधील गोळ्या या फुटलेल्या असल्याने याबाबत रूग्ण तसेच नातेवाईकांनीही रूग्णालय व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे डॉ. फुले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, कामथे रूग्णालयात झालेल्या प्रकाराची आपण प्राथमिक चौकशी केली आहे. त्यात दिलेल्या औषधांची मुदत टळली नव्हती हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फुटलेल्या गोळा देण्याची आवश्यकता नव्हती. पॅकेट कापून चांगल्या गोळ्या रूग्णांना देता आल्या असत्या. मात्र तसे का केले गेले नाही, फुटलेली औषधांची पाकिटे का दिली हा प्रश्न उरला असून त्याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94856 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..