सदानंद चव्हाण शिंदे गटात गेल्याने पोफळीत रंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदानंद चव्हाण शिंदे गटात गेल्याने पोफळीत रंगत
सदानंद चव्हाण शिंदे गटात गेल्याने पोफळीत रंगत

सदानंद चव्हाण शिंदे गटात गेल्याने पोफळीत रंगत

sakal_logo
By

सदानंद चव्हाण शिंदे गटात
गेल्याने पोफळीत रंगत
ग्रामपंचायत निवडणूक ;बाबू साळवी- चंद्रकांत सुवार तुल्यबळ गट
चिपळूण, ता. १० ः तालुक्यात राजकीयदृष्ट्या चर्चेत राहणारी पोफळी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १३ ऑक्टोबर रोजी होत असून याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य बाबू साळवी आणि माजी सरपंच चंद्रकांत सुवार हे दोन्ही गटांत तुल्यबबळ लढत आहे. त्यातच आता माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
तालुक्याच्या टोकास वसलेल्या पोफळी गावचे नेतृत्व अनेक वर्षे माजी उपसभापती व राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी यांच्याकडे राहीले आहे. मध्यंतरीच्या काळात ग्रामपंचायतीमध्ये सत्तापारिवर्तन झाल्यानंतर चंद्रकांत सुवार यांना काही काळ संधी मिळाली. त्यांच्या पत्नी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेवरही निवडून गेल्या. मात्र पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत दादा साळवी यांनी आपले पूत्र बाबू साळवी यांच्याकडे सूत्रे दिल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. सध्या या ग्रामपंचायतीवर साळवी गटाचे वर्चस्व आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार चिपळूण तालुक्यात केवळ पोफळी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतीची मुदत यापूर्वीच संपलेली असून तेथे प्रशासकीय कारभार सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून ग्रामपंचायतींची निवडणुका रखडली होती. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार येथे पाच प्रभागांमध्ये १३ जागांसाठी १३ ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. सरपंचपद ओबीसी पुरुषवर्गासाठी आरक्षित आहे.
यामध्ये पारंपरिक सुवार आणि साळवी गटात टक्कर होणार आहे. सुवार शिवसेनेशी तर साळवी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिंदे गटात गेल्यानंतर पहिलीच निवडणूक पोफळी ग्रामपंचायतीची होत आहे. परिणामी शिवसेनेची ताकद विभागण्याची चिन्हे आहे. त्यामुळे बाबू साळवींना टक्कर देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे नियोजन केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94861 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..