राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमणे भूईसपाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमणे भूईसपाट
राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमणे भूईसपाट

राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमणे भूईसपाट

sakal_logo
By

rat10p23.jpg
49258
राजापूर : अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये जप्त केलेले साहित्य, आघाडीवर राहून अतिक्रमण हटाव मोहिम राबविताना मुख्याधिकारी प्रशांत भोसले.

राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमणे भूईसपाट
मुख्याधिकाऱ्यासोबत हुज्जत ; विसर्जन मिरवणुक निर्विघ्न
राजापूर, ता. १० : अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अडथळा ठरणारी राजापूर बाजारपेठेतील अतिकमणे आणि झड्या हटविण्याचे नगर पालिकेने आदेश देऊनही काही व्यापाऱ्यानी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर राजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी पोलीस बंदोबस्तात अतिकमणांवर कारवाई केली. या कारवाईमुळे बाजारपेठेतील रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून या कारवाईचे नागरिकांतून स्वागत केले जात आहे.
शहरातील बाजारपेठेतून जाणारा रस्ता मुळातच अरूंद आहे. त्यातच गणेशोत्सवात या रस्त्यावर अनेक दुकानदारांनी दुकाने थाटली होती. काही व्यापाऱ्यानी तर अध्या रस्त्यापर्यंत साहित्य थाटले होते. शिवाय दुकानासमोर रस्त्यावर झड्या उभारल्या होता. अनंत चतुर्दशीला या मार्गावरून गणेश विसर्जन मिरवणुका जात असल्याने सदरची अतिकमणे हटविण्याच्या सूचना नगर पालिकेने व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. त्याबाबतच्या नोटीसाही प्रशासनाने बजाविल्या होत्या. मात्र काही व्यापाऱ्यानी या नोटीसांना न जुमानता नगर पालिकेले आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी मुख्याधिकारी भोसले यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेर मुख्याधिकारी भोसले यांनी या अतिक्रमणांवर काल (ता.9) धडक कारवाई करत अतिकमणे हटविली आहेत. या कारवाईनंतर पुढील तीन दिवस नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी देखरेख ठेवणार असून यापुढे अतीक्रमणे करण्याचा पुन्हा प्रयत्न झाल्यास थेट न्यायालयीन कारवाईची प्रकिया हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
------------------------------
चौकट
आता छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर
बाजारपेठेनंतर आता अतिक्रमणे हटविण्याची कारवाई छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर केली जाणार आहे. या रस्त्याचे नुकतेच एक कोटी बावीस लाख रूपये खर्च करून काँकीटीकरण करण्यात आलेले आहे. मुख्याधिकारी भोसले व सहकार्यानी केलेल्या या मोहिमेचे शहरातील नागरिकांनीच नव्हे तर व्यापाऱ्यानीही स्वागत केले आहे. शहराचा बकालपणा नष्ट करण्यासाठी नगर पालिका घेत असलेल्या भुमिकेचे व धाडसाचे कौतुक होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94870 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..