शिवसेनेतील ८० टक्के कार्यकर्ते माझ्यासोबत; सदानंद चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदानंद चव्हाण
शिवसेनेतील 80 टक्के कार्यकर्ते माझ्यासोबत

शिवसेनेतील ८० टक्के कार्यकर्ते माझ्यासोबत; सदानंद चव्हाण

चिपळूण : ‘‘मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असल्यामुळे आम्हाला विकासात्मक कामासाठी ताकद अपेक्षित होती; मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचू दिले नाही. परिणामी तीन वर्षे सर्वसामान्यासाठी काहीच करता आले नाही. येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने कोणत्या तोंडाने मतदारासमोर जायचं, हा माझ्यासह सर्वासमोर प्रश्न होता. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटीत अपेक्षापेक्षा जास्त सहकार्याची हमी मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यानंतर शिंदे गटाच्या संघटनात्मक कार्याला प्रारंभ होईल. सध्या ८० टक्के कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत,’’ असा दावा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
माजी आमदार चव्हाण यांच्या कार्यालयात शनिवारी सकाळी पत्रकार परिषद झाली.

ते म्हणाले, ‘‘२००४ पासून आपण शिवसेनेत सक्रिय झालो. त्याआधी ३ वर्षे ठाणे येथे असताना स्व. आनंद दिघे यांचे जवळून काम पाहिले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले जवळचे मित्र आहेत. मुख्यमंत्र्यांची चिपळूण मतदारसंघातील विकास कामासंदर्भात भेट घ्यावी म्हणून गेलो. त्यांच्याकडून पूर्ण समाधान झाले आहे. त्यामुळे भविष्यात चिपळूण संगमेश्वरची विकासकामे होतील. कार्यकर्त्याचेही सर्व प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहे.’’ ते म्हणाले, ‘‘शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले म्हणून आपल्याला आनंद होता. विधानसभेत पराभव झाला तरी भरीव निधी मिळेल, संघटनेला ताकद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु संघटनेला बळ देण्याचे काम झाले नाही. तीन वर्षांत मतदारसंघातील कार्यकर्त्यांना काडीचा विकास निधी मिळाला नाही. सेनेतील मधल्या यंत्रणेने आपली अडचण केली. येत्या काही दिवसात चिपळुणात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा होईल. तो धमाका मुख्यमंत्र्याच्या जाहीर सभेत होईल. आपण शिवसेना खरी व खोटी कोणती या वादात पडणार नाही. कार्यकर्ते आणि विकासासाठी आपण हा निर्णय घेत आहोत.’’

विश्रांती घेणे हा पर्याय नको
कदम म्हणाले, ‘‘राजकारणातून विश्रांती घेणे किंवा चांगला पर्याय शोधणे. याबाबत आपण मतदारसंघातील कार्यकर्त्याशी संवाद साधला, बैठकाही घेतल्या. कार्यकर्त्यांना बळ द्यायचे असेल तर चांगले माध्यम हवे आहे. मुख्यमंत्र्यासोबत विस्तृत चर्चा झाली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण आता या मतदारसंघातून जिंकण्यासाठी लढणार आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94871 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..