लोखंडी गेट अंगावर पडून मालवणात एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोखंडी गेट अंगावर पडून मालवणात एकाचा मृत्यू
लोखंडी गेट अंगावर पडून मालवणात एकाचा मृत्यू

लोखंडी गेट अंगावर पडून मालवणात एकाचा मृत्यू

sakal_logo
By

49277
बुलाजी चव्हाण

लोखंडी गेट अंगावर पडून
मालवणात एकाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० ः तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे खैदा येथील भारत गॅस गोडाऊन ठिकाणी गोडाऊन किपर असलेले बुलाजी (भाई) चंद्रकांत चव्हाण (वय ४० रा. कातवड) यांच्या अंगावर लोखंडी गेट पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.
बुलाजी चव्हाण हे अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी कामास होते. गुरुवारी रात्री गोडाऊन कंपाऊंडचे लोखंडी गेट बंद करत असताना लोखंडी गेट त्यांच्या अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याबाबत संस्थेचे व्यवस्थापक दिनेश ढोलम यांनी रात्री येथील पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली. पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. बुलाजी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवार घटनास्थळी उपस्थित झाले. काही काळ वातावरण संतप्त बनले होते. पोलिसही दाखल झाले होते. अखेर संघाच्यावतीने तत्काळ ५ लाखाची मदत देण्याचे लेखी पत्र नातेवाईकांना देण्यात आले. त्यानंतर वातावरण शांत झाले. बुलाजी यांच्या अकाली मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना भजनाची आवड होती. परिसरात भाई बुवा म्हणून ते ओळखले जात. गावातील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. कोळंबचे पंच सदस्य यशवंत चव्हाण यांचे ते भाऊ होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94883 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..