सावंतवाडीत गणरायाला चांदीचा हात अर्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत गणरायाला
चांदीचा हात अर्पण
सावंतवाडीत गणरायाला चांदीचा हात अर्पण

सावंतवाडीत गणरायाला चांदीचा हात अर्पण

sakal_logo
By

49289
सावंतवाडी ः सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशाला अर्पण केलेला चांदीचा हात.

सावंतवाडीत गणरायाला
चांदीचा हात अर्पण
सावंतवाडी ः सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश चतुर्थी सणाला ११७ वर्षे झाली असून गणपती चरणी चांदीचा हात भक्तांनी अर्पण केला आहे. कोकणातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा येथील गणराय आहे. यावर्षी ११७ व्या वर्षांच औचित्य साधून मंडळाकडून श्री गणपती चरणी चांदीचा हात अर्पण करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या शुभ दिनी सकाळी १० वाजता हा चांदीचा हात श्री चरणी विधिवत अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
---------
फटाक्यांमुळे सावंतवाडीत टपरीला आग
सावंतवाडी ः येथील पंचायत समिती कार्यालयासमोर फटाक्याची आग लागल्यामुळे असलेली चहाची टपरी पेटली. मात्र, वेळीच स्थानिकांनी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. यात संबधित टपरी चालकाचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा प्रकार गुरूवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. बाजूने गणेश विसर्जनासाठी जाणार्‍या काही अतिहौशी युवकांनी त्या स्टॉलवर फटाके फेकले. यात टपरीला लपेटून ठेवलेले प्लास्टीक जळले. त्यामुळे काही वेळातच या टपरीने पेट घेतला. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांनी ही आग विझवली. सावंतवाडी पोलिस आणि पालिकेचा बंब दाखल झाला; परंतु, त्यापुर्वीच आग विझविण्यास यश आले. यात संबधित टपरी चालकाचे किरकोळ नुकसान झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94894 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..