पान एक-तब्बल 43 लाखांची दारु पकडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-तब्बल 43 लाखांची दारु पकडली
पान एक-तब्बल 43 लाखांची दारु पकडली

पान एक-तब्बल 43 लाखांची दारु पकडली

sakal_logo
By

टीपः swt1029.jpg मध्ये फोटो आहे.
49324
बांदा ः संशयित व मुद्देमालासह एक्साईजच्या कोल्हापूर भरारी पथकाचे कर्मचारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात ४३ लाखांची दारू पकडली

वाफोलीतील तरुण ताब्यात; ट्रकमधून बेकायदा वाहतूक

बांदा, ता. १० ः गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूरच्या भरारी पथकाने आज सकाळी मोठी कारवाई केली. या कारवाईत विविध ब्रँडची ६०० दारूची खोकी जप्त करण्यात आली. कारवाईत ४३ लाख ४२ हजार ८० रुपयांची दारू व १२ लाखांचा टेम्पो असा एकूण ५५ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी संजय मारुती गवस (वय ४२, रा. वाफोली-मधलीवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
गोव्यातून महाराष्ट्रात होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क खात्याचे कोल्हापूर भरारी पथक कार्यरत झाले आहे. आज सकाळी गोव्यातून येणारा टेम्पो तपासणीसाठी येथे थांबविण्यात आला. टेम्पोवर (एमएच ४६, एफ २३९८) व (जीए ०५, टी ३००९) अशा दोन नंबर प्लेट चिकटवल्या होत्या. यामुळे अधिकाऱ्‍यांना संशय आल्याने तपासणी केली असता, टेम्पोत ६०० दारूची खोकी आढळून आली. याप्रकरणी वाफोलीच्या संजय गवस या तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. अधिक तपास एस. एस. गोंदकर करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94929 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..