''मातृ वंदना'' योजनेस जिल्ह्यात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मातृ वंदना'' योजनेस जिल्ह्यात प्रतिसाद
''मातृ वंदना'' योजनेस जिल्ह्यात प्रतिसाद

''मातृ वंदना'' योजनेस जिल्ह्यात प्रतिसाद

sakal_logo
By

61929

‘मातृ वंदना’ योजनेस जिल्ह्यात प्रतिसाद

डॉ. महेश खलिपे ः २० हजार २१७ लाभार्थींनी घेतला लाभ

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा आतापर्यंत जिल्ह्यातील २० हजार २१७ लाभार्थींनी लाभ घेतला असून त्यांच्या बँक खात्यावर ८ कोटी ६९ लाख ११ हजार रुपये अनुदान वर्ग करण्यात आले असून या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे व जिल्हा कार्यक्रम समन्वयक दयानंद कांबळे यांनी दिली.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०१७ पासून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० हजार २१७ महिला लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात ‘मातृवंदना सप्ताह’ राबविण्यात येतो. मातृ वंदना ही केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ जानेवारी २०१७ रोजी अथवा तद्नंतर ज्या पहिल्या खेपेच्या गरोदर मातांची प्रसुती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल, अशा पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी देण्यात येतो. योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना १०००, २००० व २००० अशा तीन हप्त्यांमध्ये एकूण ५ हजार रुपये लाभ दिला जातो. ही योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून इतर सर्व पहिल्या खेपेच्या मातांना दिला जातो.
सप्ताह कालावधीमध्ये मातृवंदना योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सर्व सेवा कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना लाभ देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता १००० रुपयेप्रमाणे १८,१८३ लाभार्थींना १ कोटी ८१ लाख ८३ हजार, दुसरा हप्ता २००० रुपयेप्रमाणे १८,७०८ लाभार्थींना ३ कोटी ७४ लाख १६ हजार, तर तिसरा हप्ता २००० रुपये प्रमाणे १५, ६४१ लाभार्थींना ३ कोटी १२ लाख ८२ हजार अनुदान वितरित करून लाभ देण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र लाभर्थींनी प्रस्ताव करावेत, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम समन्वयक कांबळे यांनी केले आहे.
............
तालुकानिहाय लाभार्थी
वैभववाडी १३५८, कणकवली २६४८, देवगड २४९८, मालवण १९२५, कुडाळ ३५१८, वेंगुर्ले १८६८, सावंतवाड़ी २९२०, दोडामार्ग १३७१, तर नगरपंचायत कणकवली ६३८, मालवण ५२४, सावंतवाड़ी ५०२, वेंगुर्ले ४४७ अशा एकूण २० हजार २१७ लाभार्थींना गेल्या चार वर्षांत लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी दिली.
................
कोट
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये शहरी भागातील लाभार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. या योजनेत खासगी सेवा घेणाऱ्या महिलांचाही समावेश असून त्यांनीही लाभ घ्यावा. त्यासाठी खासगी डॉक्टरनी या योजनेबाबत आपल्याकडे सेवा घेणाऱ्या महिलांना माहिती द्यावी.
- डॉ. दयानंद कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95034 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..