नव्या शैक्षणिक क्रांतीसाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या शैक्षणिक क्रांतीसाठी प्रयत्न
नव्या शैक्षणिक क्रांतीसाठी प्रयत्न

नव्या शैक्षणिक क्रांतीसाठी प्रयत्न

sakal_logo
By

49396
सावंतवाडी ः येथे आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ‘गुरुसेवा’ पुरस्कार स्विकारताना शिक्षक.

नव्या शैक्षणिक क्रांतीसाठी प्रयत्न

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ः ‘गुरुसेवा’ पुरस्कारांचे सावंतवाडीत वितरण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः माझ्याकडे शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर अनेकांनी या पदात ताकद नाही, असे म्हटले होते; मात्र शिक्षणातच खरी ताकद आहे, हे दाखवून द्यायचे आहे. या क्षेत्रात काम करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. त्यासाठी दूरदृष्टी ठेवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शैक्षणिक क्रांती करण्यासाठी निश्चितच काम करेन, असा विश्वास आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षकांना अतिरिक्त जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दीपक केसरकर पुरस्कृत (कै.) वसंतशेठ केसरकर स्मरणार्थ ‘गुरुसेवा’ शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी येथे उत्साहात पार पडला. यावेळी २७ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री केसरकर बोलत होते. व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे, जिल्हा बँक माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, परफेक्ट अॅकॅडमीचे राजाराम परब, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या कौशल्यात्मक गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना आठवीपासूनच व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यासंदर्भात विचार सुरू आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. त्यामुळे शिक्षकांनी कोणतीही अडचण आल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा, त्यातून नक्कीच मार्ग काढला जाईल. सिंधुदुर्गात शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी येथे कार्यरत शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे. तरीसुद्धा येथील शैक्षणिक पद्धतीत अनेक समस्या उद्भवतात. त्यांना विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुद्धा सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात वेगळी शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकातच विद्यार्थ्यांना नोट्स देण्याची संकल्पना मांडली असून ती लवकर अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्यांचा खर्च कमी होणार आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल.’’ यावेळी सिंधुदुर्गचा शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे शिक्षका आणि उत्तम गुणांसह यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी अनिल कांबळे, श्रुतिका कुबल, पौर्णिमा हळदणकर, सागर मेस्त्री, भगीरथ चिंदरकर, संजीवनी फडके, रुपाली सलामदेड, संगीता सोनटक्के, संतोष पवार, पांडुरंग कोचरेकर, वृषाली गवस, दत्ताराम गवस, पल्लवी काळे, विवेकानंद कडू, संतोष कदम, दीक्षा तोंडळकर, भक्ती पाटील, विलास गोठोस्कर, प्रसाद राणे, राजेश कदम, रविराज राजवीर, अंकुश मिरकर, तानाजी काळे आदींचा ‘गुरुसेवा’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
--
बापूसाहेब महाराजांचा धडा हवा
माजी उपनगराध्यक्ष पोकळे म्हणाले की, सावंतवाडी संस्थानचे राजे बापूसाहेब महाराजांचा एखादा धडा पाठ्यपुस्तकात असावा. अध्यापक संघाचे अध्यक्ष लांडगे यांनी शिक्षक सन्मानाचे कौतुक करून याचा आदर्श राज्याने घ्यावा, असे मत व्यक्त केले. गुरु सेवा पुरस्कार म्हणजे चेतना प्रेरणा आणि आदर निर्माण करणारे काम आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95035 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..