गुहागर ः राज्यभर ऑफ्रोहचा आंदोलनाचा पवित्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर  ः राज्यभर ऑफ्रोहचा आंदोलनाचा पवित्रा
गुहागर ः राज्यभर ऑफ्रोहचा आंदोलनाचा पवित्रा

गुहागर ः राज्यभर ऑफ्रोहचा आंदोलनाचा पवित्रा

sakal_logo
By

फोटो- rat११p४.jpg -ØKOP२२L४९३८७ गुहागर ः राज्यभर ऑफ्रोह आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती देताना ऑफ्रोहचे कर्मचारी नेते.

राज्यभर ऑफ्रोहचा २६ पासून आंदोलनाचा पवित्रा
---
कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण; जात प्रमाणपत्रांचा वाद सुरू
गुहागर, ता. ११ ः अनुसूचित जमातीचे अस्सल जात प्रमाणपत्र वादग्रस्त असलेल्या पडताळणीसमिती कडून फसवणूकीने रद्द व जप्त करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या ६ जुलै २०१७ ला दिलेल्या निर्णयात ''पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा'' असे आदेश दिलेले नसताना राज्यातील १२ हजार ५०० सेवेत कायम असणाऱ्या व वेळोवेळी विविध शासननिर्णयाने सेवा संरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांना २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये ११ महिन्याच्या तात्पुरत्या सेवेवर वर्ग करणे, सुमारे १ हजार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या ३१ महिन्यांपासून पेन्शन न देणे तसेच मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन व इतर लाभ न देणे यासारखा अन्यायाविरोधात राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा ''ऑफ्रोह'' चे प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर व महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष माधुरी मेनकार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषा पारशे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या बाबतीत २० सप्टेंबरपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पडताळणी समित्यांनी राज्यातील अनेक जमातींच्या लोकांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र फसवणुकीने व लबाडीने अवैध/रद्द केले आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ६ जुलै २०१७ ला दिलेल्या निर्णयात ''पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा'' असे आदेश दिलेले नसताना राज्यातील सेवेत कायम असणाऱ्या व वेळोवेळी विविध शासन निर्णयाने सेवा संरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांना २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये ११ महिन्याच्या तात्पुरत्या सेवेवर वर्ग केले आहे. याच कालावधीत मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्तीवेतन व इतर लाभही प्राप्त झाले नाहीत. २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४.२ नुसार अजूनही अनेक सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदाचे आदेश दिले नाहीत, हा कर्मचाऱ्यांवरील अन्याय असल्याचे त्यानी सांगितले.

चौकट
नेतेही उपोषणाला बसणार
राज्यभरात ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, यवतमाळला राज्य सचिव रूपेश पाल यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यात राज्य प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर उपोषणाला बसणार असून, रत्नागिरीत त्यांच्यासोबत महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष नंदा राणे, देवकीनंदन सपकाळे, विलास देशमुख, शिला देशमुख, राजकन्या भांडे, प्रियंका इंगळे, सुरेखा घावट आदी कर्मचारी उपोषणाला बसणार आहेत, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95041 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..